www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
IPL मधील पुणे वॉरियर्स टीमने माघार घेतली आहे. टीमचे मालक असणाऱ्या सहारा समुहाच्या बीसीसीआयसोबत असलेल्या वादांमुळे पुण्याच्या टीमने IPL मधून नाव मागे घेतल्याचं सांगण्यात येत आहे. सहारा समुहाच्या सांगण्यानुसार बँक गॅरंटीवरून सहारा आणि बीसीसीआयमध्ये वाद झाले आहेत.
टीमच्या प्रतिनिधींनी मंगळवारी खुलासा केला, की फ्रंचायजीद्वारा फी न भरल्यामुळे पुण्याच्या टीमने IPL मधून आपलं नाव मागे घेतलं आहे. सहारा समुहाने पुणे वॉरियर्सही टीम १७०० कोटी रुपये देऊन खरेदी केली होती.
सहाराचा आरोप आहे, की BCCI ला केवळ पैशांमध्येच रस आहे. जेव्हा टीम विकत घेतली गेली होती, तेव्हा टीमला ९४ मॅचेस खेळण्यास दिल्या जाणार होत्या. मात्र जेमतेम ६४ मॅचेसच त्यांना खेळायला मिळाल्या. यामुळे टीमचं नुकसान झालं.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.