www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
स्पॉट फिक्सिंग प्रकरणात अभिनेता विंदू दारा सिंगला अटक करण्यात आली आहे. या कारवाईमुळे बॉलीवूडमध्ये खळबळ उडाली आहे. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने विंदू दारा सिंगला अटक केली आहे. बुकीजसोबत असलेल्या संबंधामुळे विंदूला अटक करण्यात आली आहे.
बुकी रमेश व्याससोबत त्याचे संबंध असल्याचा संशय आहे. स्पॉट फिक्सिंगप्रकरणात प्रथमच बॉलीवूडमधील एखाद्या कलावंताला अटक करण्यात आली आहे. विंदूच्या अटकेनंतर अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.
विंदू दारा सिंगने चेन्नई सुपर किंग्संच्या व्हीआयपी स्टँरडमध्ये बसून 6 एप्रिल रोजी मुंबईविरुद्धचा सामना पाहिला होता. महेंद्रसिंग धोनीची पत्नी साक्षी हिच्यासोबत त्याने सामन्याचा आनंद लुटला. साक्षीसोबत तो एखाद्या जुन्या मित्राप्रमाणे वावरत होता. हे पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटले होते.
यासंदर्भात महेंद्रसिंग धोनीने स्पष्टी्करण दिले असून विंदू सेलिब्रिटी असल्यामुळेच व्हीव्हीआयपी स्टँडमध्ये आमंत्रण देण्यात आले होते. याव्यतिरिक्त त्याच्याशी इतर कोणताही संबंध नाही, असे धोनीने म्हटले आहे.
दरम्यान, आयपीएलच्या सहाव्या सीझनच्या प्ले-ऑफच्या मॅचेस होणारच असा निर्णय आज सुप्रीम कोर्टानं दिला. यामुळे बीसीसीआयला मोठा दिलासा मिळाला आहे.
काही लोकांमुळे आयपीएलवर बंदी आणू शकत नाही असंही सुप्रीम कोर्टानं म्हटलं आहे. त्याचप्रमाणे सुप्रीम कोर्टानं 15 दिवसात भारतीय क्रिकेट बोर्ड अर्थातच बीसीसीआयकडून अहवाल मागितला आहे.
त्याचप्रमाणे दोषींवर कडक कारवाई करण्याचे आदेशही बीसीसीआयला देण्यात आले आहेत. दरम्यान, प्ले-ऑफच्या मॅचेसवर बंदी आणावी अशी जनहित याचिका सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आली होती.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.