मय्यपन यांना कोणत्याही क्षणी होणार अटक

स्पॉट फिक्सिंग प्रकरणाचा तपास करण्यासाठी मुंबई पोलिसांची टीम चेन्नईत दाखल झाली असून मय्यपन यांना उद्यापर्यंत हजर राहण्याचा समन्स बजावला आहे. मय्यपन याला दिसताक्षणी अटक करण्याचे आदेश मुंबई पोलिसांनी टीमला दिले आहे.

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: May 23, 2013, 04:42 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, चेन्नई
स्पॉट फिक्सिंग प्रकरणाचा तपास करण्यासाठी मुंबई पोलिसांची टीम चेन्नईत दाखल झाली असून मय्यपन यांना उद्यापर्यंत हजर राहण्याचा समन्स बजावला आहे. मय्यपन याला दिसताक्षणी अटक करण्याचे आदेश मुंबई पोलिसांनी टीमला दिले आहे.
आज गुरूनाथ मय्यपन यांची चौकशी करण्यासाठी मुंबई पोलिसांची टीम चेन्नईत दाखल झाली. या वेळी त्यांनी मय्यपन यांच्या घरी आणि चेन्नई सुपरकिंग्जच्या ऑफीसमध्ये समन्स चिकटविले. या समन्सनुसार मय्यपन यांना उद्या सकाळी ११ ते ५ या वेळेत मुंबई पोलिसांसमोर हजर राहण्यासा सांगितले आहे.
मय्यपन हे बीसीसीआयचे अध्यक्ष आणि सीएसकेचे मालक एन. श्रीनिवासन यांचे जावई आहेत. स्पॉट फिक्सिंग प्रकरणी अटकेत असलेला अभिनेता विंदूचेही ते घनिष्ठ मित्र असल्यानं त्यांच्या चौकशीत आणखी नवी माहिती समोर येण्याची शक्यता आहे.

मय्यपनमुळे फिक्सिंग प्रकरण गुंतागुंतीचे
फिक्सिंग प्रकरणी चेन्नई सुपर किंग्जचे मालक गुरुनाथ मयप्पन यांची चौकशी मुंबई पोलीस करणार आहेत...गुरुनाथ मयप्पन हे केवळ आयपीएल मधील एका टीमचे मालक आहेत असं नाही तर ते बीबीसीआय अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांचे जावई देखील आहेत..त्यामुळे हे प्रकरण आणखी गुंतागुंतीचं बनलंय..
मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्या दरम्यान चेन्नईत खेळल्या गेलेल्या या आयपीएल मॅचमधील ही दृश्य चेन्नई सुपर किंग्जचे मालक गुरुनाथ मयप्पन यांना भोवण्याची शक्यता निर्माण झालीय..फिक्सिंग प्रकरणात अटक करण्यात आलेल्या विंदूने गुरुनाथ मयप्पनशी आपली मैत्री असल्याचं पोलिसांना सांगितलं...त्यामुळे गुरुनाथ मयप्पन चर्चेत आलेत..
चेन्नई सुपरकिंग्जचे मालक एव्हडीच गुरुनाथ मयप्पनची ओळख आहे असं नाही तर ते भारतीय क्रिकेटची सर्वोच्च संस्था बीसीसीआयचे अध्यक्ष एन. श्रीनिवासन याचे जावई आहेत..मयप्पन यांची दक्षिणेत एव्हीएम ही मनोरंजन क्षेत्रातील जूनी तसेच मोठी कंपनी आहे...
गुरुनाथ हे एव्हीएम कंपनीचे संचालक आहेत..गुरुनाथ यांना गोल्फ आणि मोटर शर्यतीचा छंद आहे...त्यांनी हौशी गोल्फ स्पर्धा जिंकली होती..तसेच फॉर्म्यूला एशिया स्पर्धा पूर्ण करणा-यांमध्ये गुरुनाथ यांचा समावेश आहे.. पण आता विंदूशी असलेले त्यांची मैत्री त्यांना भोवणार तर नाही ना ? अशी शंका व्यक्त केली जात आहे...कारण दोन अडिच वर्षांपासून गुरुनाथ यांची विंदूशी मैत्री असून फिक्सिंगप्रकरणात विंदू अडकल्यामुळे गुरुनाथ यांनाही चौकशीला सामोरं जावं लागण्याची शक्यता निर्माण झालीय...
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.