www.24taas.com, नवी दिल्ली
काही असे ऐतिहासिक क्षण असतात की त्यात प्रत्येकाला वाटते की काही तरी नवीन करावे आणि त्यामुळे त्यांचे जीवन सुखमय आणि तो क्षण आयुष्यभर लक्षात राहील. येत्या बुधवारी असा क्षण येणार आहे. १२ हा आकडा बुधवारी त्रिपदी संयोगात येणार आहे. (१२.१२.१२) ही तारीख या वर्षातील काही खास तारखांपैकी एक अशी आहे
.
एवढेच नाही तर या दिवशी १२ वाजून १२ मिनिटे आणि १२ सेकंदाच्या वेळी वर्ष, महिना, दिनांक, तास, मिनिट आणि सेकंदाचा एकच आकडा असणार आहे. भारतीय ज्योतिषांनी या दिवसाला खास करून शुभ आणि मंगलदायी ठरविले आहे.
दुर्लभ क्षण
बऱ्याच दुर्लभ क्षणांपैकी एक असलेला हा क्षण तब्बल शंभर वर्षांनतर येणार आहे. त्यामुळे भारतासह पाश्चिमात्य देशात याला फार महत्त्व प्रात्त झाल आहे. त्यामुळे देशासह जगभरातील असंख्य लोकांनी याला शुभ मानून काही महत्वपूण काम करण्याचे ठरवले आहे. यात लग्नासह बऱ्याच नव्या वस्तू घरात आणण्याचा अनेकांना मनोदय केला आहे.
अंकाचा खेळ
१२ डिसेंबर २०१२ ला बुधवार आहे. अनुराधा नक्षत्र, धृती योग, विषकुंभक करण, सकाळी ७.४८ मिनिटांपर्यंत आहे. चंद्र या दिवशी वृश्चिक राशीत आहे. या दिवशी मार्गशीष कृष्ण चर्तुदशी आहे. या दिवशी कोणताही विवाहाचा मुहूर्त नाही. परंतु, अंक विज्ञानानुसार १२-१२-१२ म्हणजे ३.३.३= ९ होतो. त्यामुळे ९ तारीख मंगल कार्य करण्यासाठी उत्तम आहे.
ज्योतिषाचार्यांनुसार महत्त्व
१२ सहावेळा येणारी ही घटना देश आणि विदेशात मोठ्या प्रमाणात आर्थिक आणि राजकीय फेर-बदल घडविणारी ठरणार आहे. तसेच राशींच्या संयोगावर याचा विशेष प्रभाव होणार आहे.
राशींवर प्रभाव
हा दिवस मेष, वृषभ, कर्क, तुला, धनु, कुंभ, मकर आणि मिथुन या राशींसाठी विशेष फलदायी ठरणार आहे. तसेच सिंह, कन्या, वृश्चिक आणि मीनसाठी हा क्षण अशुभ आहे.