करून घेऊया सापांशी ओळख

अन्न साखळीचा प्रमुख घटक असलेल्या आणि लुप्त होण्याच्या मार्गावरील सापांची ओळख सांगणारा हा आमचा विशेष वृत्तांत...

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Aug 11, 2013, 02:36 PM IST

आज नागपंचमी... सर्प ही शक्ती आणि प्रजननाची देवता असल्याचे अनेक दाखले पुराणात आहेत... मात्र यंत्रयुगात या सापांच्या अनेक जाती नष्ट झाल्यात तर काही नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत... अन्न साखळीचा प्रमुख घटक असलेल्या आणि लुप्त होण्याच्या मार्गावरील सापांची ओळख सांगणारा हा आमचा विशेष वृत्तांत...
भारतात सापांच्या अनेक जाती आहेत मात्र त्यांत हाताच्या बोटांवर मोजता येतील इतक्याच जाती विषारी आहेत...
नागराज
नागाच्या भारतात तीन प्रजाती आढळतात नागराज अर्थात भुजंग याला किंग कोब्रा म्हणूनही ओळखलं जातं... हा साप विषारी असून तो 18 फुट लांबीपर्यंत वाढल्याची नोंद आहे. घनदाट जंगलातच हा साप प्रामुख्याने आढळतो.. हा साप प्रामुख्याने इतर सापांनाच खातो म्हणूनच याला सापांचा राजा असं म्हणतात... गंमत म्हणजे पालापाचोळ्याचं घरटं बांधून अंडी उबवणारा हा पृश्वीवरचा एकमेव साप आहे. वाढत्या शिकारीमुळे युनोस्कोनं या सापाला रेड लिस्टमध्ये दाखल केलंय.
गव्हाळी नाग
भारतात सर्वत्र आढळणारा हा विषारी साप. डिवचलं की फुत्कारणारा आणि फणा काढणारा.. याच्या अंगावर गव्हासारखी नक्षी असते म्हणून याला गव्हाळी नाग म्हणतात. पिवळसर आणि काळा अशा दोन रंगांत हा साप आढळतो.. याच्या फण्यावर चस्म्यासारखी नक्षी असल्यानं याला स्पेक्टीकल कोब्रा असं शास्त्रीय नाव दिल गेलंय. उंदीर घुशी बेडूक पक्षी हे याचं मुख्य खाद्य. त्यामुळे हा साप शेतात जास्त आढळतो शेतातल्या उंदरांचा सफाया करतो म्हणून शेतक-यांचा मित्र. हा साप साडेतीन ते चार फुटांपर्यंत वाढतो.. याचं विष मज्जातंतूंवर परिणाम करतं... त्यामुळे अनेक औषधं बनवण्यासाठी त्याचा वापर होतो. अंधश्रद्धा कातडी आणि विष यामुळे या सापाची मोठ्या प्रमाणावर शिकार होते. याशीवाय बंगाल नाग अशीही याची एक प्रजाती आढळते जीच्या फण्यावर डोळ्याच्या आकाराची नक्षी असते...
घोणस
तीन ते चार फूटांपर्यंत वाढणारा हा साप शरिराने स्थूल पण चपळ असतो.. व्हायपर अर्थात चाबूक जमातिच्या या सापाच्या शरिरावर तपकरी पिवळट रंगाच्या या सापावर रुद्राक्षांच्या आकारासारखी सुंदर नक्षी असते. याचे विषाचे दात हे सर्वात लांब आणि दुमडणारे असतात. सरडे, उंदीर, पाली विंचू खाणारा हा साप मानवी वस्तीजवळ आणि दगडांच्या फटींमध्ये जास्त आढळतो. याचं विष हे रक्तपेशींवर आघात करतं. गंमत म्हणजे हा साप अंडी न देता थेट पिलांना जन्म देतो...
फुरसे
फुट दिड फूट लांब वाढणारा हा सापही व्हायपर जमातीतला.. विंचू सरडे आणि उंदिर हे या सापाचं प्रमुख खाद्य. कोकणात या सापाचं प्रमाण जास्त आढळतं. बांबूची बेटं खडकाळ जमीन हे यासापाचं आवडतं ठिकाण. तपकीरी किंवा रेतीच्या रंगाच्या या सापाच्या पाठीवर शंकरपाळ्यांसारखी सुंदर नक्षी असते. माने पेक्षा डोकं मोठं, त्रिकोणी आणि त्यावर बाणासारखी खूण असते डोळे बटबटीत असतात. अत्यंत जलद गतीनं हा साप दंश करतो. याचं विषही रक्तपेषींवर आघात करतं.
मण्यार
मध्यम आकाराचा गुळगुळीत चककटकीत काळे खवले असणा-या या सापाची मान वगळता संपुर्ण अंगावर पांढरे पट्टे असतात. याच्या एका प्रजातीवर काळे पिवळे पट्टेही आढळात तो पट्टेरी मण्यार. अत्यंत बुजरा असणारा हा साप सरडे, बेडूक आणि इतर साप खाउन जगतो निशाचर असल्याने हा प्रामुख्यानं रात्रीच आढळतो.. प्रतिविष बनवण्यासाठी याच्या विषाचा वापर होतो.
मृतसिंग सर्पमित्र
विषारी सापांपेक्षा बिनविषारी सापच आपल्याकडे जास्त आढळतात मात्र अज्ञानामुळे त्यांची मोठ्या प्रमाणात हत्या होते.

अजगर
नावाप्रमाणं हा साप अजस्त्र वाढतो. याची प्रमुख जमात म्हणजे इंडियन रॉक पायथन. आकर्शक रंगांमुळे याच्या कातडीला अधीक मागणी आहे. बिनवीषारी असला तरी यात प्रचंड ताकत असते. हा साप 18 फुटांपर्यंत वाढल्याची नोंद आहे. उंदीर, घुषी,कोल्हे,रानडुक्कर हे याचं खाद्य. दाट जंगलात झाडांवर हा साप आढळतो.
धामण
उंदीर खाणा-या या बिनविषारी सापाला रॅटस्नेक असंही म्हणतात. बिनवीषारी आणी उंदीर खाणारा म्हणून शेतक-याचा खरा मित्र मात्र गैर समजुतींमुळे याची मोठ्या प्रमाणात हत्या होते. फिक्कट पिवळा किंवा काळपट रंगाच्या या सापाच्या तोंडावर काळ्या ठळक उभ्या रेशा असतात. हा साप 8 फूटांपर्यंत वाढतो. सरडे घुषी आणि उंदिर हे याचे प्रमुख खाद्य.
कवड्या
दोन फुटांपर्यंत वाढणारा हा साप काळपट रंगाचा असून त्यावर पांढरे पट्टे असतात ब-याचदा याला मण्यार समजून मारलं जातं. त्यामुळे हा साप दुर्मीळ