मनसेचा झेंडा हाती घेतला आणि `तो` तुरुंगातच...

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या अटकेनंतर राज्यभर आंदोलनाचे पेव फुटले औरंगाबादही त्यात मागं नव्हतं मात्र या आंदोलनात उतरला म्हणून औरंगाबादच्या एका मनसे कार्यकर्त्याला चांगल्याच वेदना सहन कराव्या लागल्या.. तब्बल ६ दिवस जेलमध्ये त्याला राहावं लागलं आणि कुणीही पदाधिकारी त्याला सोडवायला आले नाही, अखेर कुटुंबियांनीच दागिने गहाण टाकत घरच्या या कर्त्या मुलाची सुटका केली.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Feb 26, 2014, 03:51 PM IST

www.24taas.com, विशाल करोळे, औरंगाबाद
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या अटकेनंतर राज्यभर आंदोलनाचे पेव फुटले औरंगाबादही त्यात मागं नव्हतं मात्र या आंदोलनात उतरला म्हणून औरंगाबादच्या एका मनसे कार्यकर्त्याला चांगल्याच वेदना सहन कराव्या लागल्या.. तब्बल ६ दिवस जेलमध्ये त्याला राहावं लागलं आणि कुणीही पदाधिकारी त्याला सोडवायला आले नाही, अखेर कुटुंबीयांनीच दागिने गहाण टाकत घरच्या या कर्त्या मुलाची सुटका केली.
राज ठाकरेंचा आदेश मिळाल्यावर राज्यभरातील मनसे कार्यकर्ते साहेबांच्या आदेशाने पेटून उठले. राज्यभर आंदोलनाचे रण पेटले. महाराष्ट्रातील टोल कार्यकर्त्यांनी फोडून काढले. हेच वातावरण औरंगाबादेचही होतं. राज ठाकरेंना अटक झाल्यानंतर हिंसक आंदोलनांना वेग आला. औरंगाबादेतही १२ बसची तोडफोड झाली त्यात १२ मनसे कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली.
यामध्ये एक होता औरंगाबादचा मनसे कार्यकर्ता श्रीकांत ढगे. खरतर ढगे तोडफोड आंदोलनात नव्हता मात्र तोडफोड करणा-या कार्यकर्त्यांना भेटायला गेला म्हणून पोलिसांनी त्यालाही ताब्यात घेतल. आणि तब्बल सहा दिवस श्रीकांतला जेलमध्ये रहावं लागल. या सगल्या काळात मनसेच्या एकाही कार्यकर्त्याने त्याला सोडवालया मदत केली नाही.
घरची परिस्थिती जेमतेम घरचा कर्ता पुरूष हाच त्यामुळे याचा जमानतीसाठी लागणारे 25 हजार रुपये जमवणेही कुटुंबियांना कठीण. श्रीकांतच्या आईला तर अजूनही ती वेळ आठवलं की ढसाढसा रडायला येते.. कसतरी श्रीकांतच्या बायकोच्या गळ्यातील हार आणि स्वताची पोत गहाण ठेवून पैसै जमवले आणि पोराची जमानत केल्याचं श्रीकांतची आई सांगतेय.
 
प्लॉटींगचा व्यवसाय करणारा श्रीकांतन आपल्या आई बायको आणि लहान भाऊ आणि त्याच्या चिमुकल्या मुलीसह दोन रुमच्या घरात राहतो. राज ठाकरेंच्या विचारांनी प्रेरीत होऊन आणि काही लोकसेवा करण्याची इच्छा मनी बाळगून तो त्याने मनसेचा झेंडा हाती घेतला मात्र ज्या पक्षातील नेत्यांसाठी दिवसरात्र कष्ट केले,  सणवार पाहिले नाहीत,  आदेश दिला की हातात दगड घेऊन उभा राहिला मात्र त्यांनीच दिलेल्या वेदनांनी आता श्रीकांत व्यथित झालाय.
 
मनसेच्या पदाधिकार्‍यांनी मला माझ्या वाढदिवशी तुरुंगात खितपत पडू दिले. त्यांच्यापेक्षा पोलीस बरे. त्यांनी वाढदिवशी पेढय़ाचा घास तरी भरवला हे दु:खी श्रीकांतचे शब्द आहेत. मात्र शहराचे मनसे पदाधिकारी मात्र कार्यकर्त्याचा काहीतरी गैरसमज झाल्याचं सागताय. सत्य काहीही असो मात्र राजकारणात येण्याचं स्वप्न पाहणा-या सर्मसामान्यांसाठी हे स्वप्नभंगच ना अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
पाहा व्हिडिओ