सट्टेबाजांचा हायटेक फंडा

सट्ट्याचा धंदा आज हजार कोटींच्या घरात जाऊन पोहोचलाय..मात्र त्यावर लगाम लावण्यात सरकारला अद्यापही यश येतांना दिसत नाही..पोलिसांकडून कारवाई केली जाते पण या धंद्यातला मोठे मासे काही त्यांच्या हाती लागत नाही..

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Mar 4, 2013, 11:21 PM IST

www.24taas.com, मुंबई
सट्ट्याचा धंदा आज हजार कोटींच्या घरात जाऊन पोहोचलाय..मात्र त्यावर लगाम लावण्यात सरकारला अद्यापही यश येतांना दिसत नाही..पोलिसांकडून कारवाई केली जाते पण या धंद्यातला मोठे मासे काही त्यांच्या हाती लागत नाही..
भारतीय क्रिकेट टीम जेव्हा मैदानवर उतरते तेव्हा सव्वाशे कोटी भारतीयांचे डोळे त्या मॅचकडे लागून राहिलेले असतात...कारण क्रिकेट हा भारतीयांच्या रक्तात भिनला आहे. पण गेल्या वर्षभारत भारतीय क्रिकेट टीमची लय बिघडल्यामुळे टीम इंडियाला पराभवाचं ग्रहण लागलं आणि क्रिकेट प्रेमीही निराश झाले...पण आता भारत - ऑस्ट्रेलिया दरम्यान कसोटी सामन्यात टीम इंडियाने कमबॅक केल्यामुळे क्रिकेटप्रेमी जसे खूष झालेत तसेच सट्टेबाजही सक्रीय झालेत...भारत- ऑस्ट्रेलिया दरम्यान सुरु असलेल्या सामन्यांवर ५००० कोटी रुपयांचा सट्टा लागला असल्याचं बोललं जातंय..खरं तर केवळ क्रिकेटवरच सट्टा लावला जातो असं नाही तर निवडणुकांपासून ते बजेटपर्यंत सट्टेबाज सट्टा घेतात..एका अंदाजानुसार प्रत्येक वर्षी एक लाख कोटी रुपयांचा सट्टा खेळला जातो.. लॉटरी आणि घोड्यांच्या शर्यतीप्रमाणेच स्पोर्ट बेटिंगलाही सरकारने मान्यता द्यावी असा युक्तीवाद काहीजण करत आहेत..कारण ब-याच देशात स्पोर्ट बेटिंगला मान्यता देण्यात आली आहे..भारतात तशी मान्यता दिली गेल्यास सरकारला ३० ते ३५ हजार कोटी रुपयांचा टॅक्स मिळेल..

जगाचा विचार केल्यास इंग्लड तसेच अन्य काही देशां मध्ये स्पोर्ट बेटिंग कायदा अस्तित्वात आहे.. त्यामुळे सट्टेबाज तसेच गुन्हेगारांच्या शिरकावावर लगाम लागला आहे..पण नैतिकदृष्ट्या स्पोर्ट बेटिंग अयोग्य असल्याचं माननारा समाजात मोठा वर्ग आहे....कारण त्यामुळे खेळ हा खेळ राहणार नाही..त्याला व्यवसायाचं रुप येईल अशी भिती काहींनी व्यक्त केलीय..सट्टेबाजीच्या समर्थनार्थ तसेच त्याच्या विरोधात युक्तीवाद करणारे अनेक आहेत..पण सरकारने बंदी घालूनही सट्टा रोखण्यात मात्र सरकारला म्हणावं तस यश येतांना दिसत नाही हे नाकारुन चालणार नाही..त्यामुळे सट्टेबाजी रोखण्यासाठी सरकारने आणखी कठोर पावलं उचलण्याची आवश्यकता आहे..
सट्टेबाजीच्या धंद्यातील फोन कॉ़ल पाकिस्तानातून केला जातो आणि मग तो मुंबई सारख्या महानगरापासून ते छोट्यामोठ्या शहरापर्यंत जाऊन पोहोचतो.. पोलिसांचा ससेमिरा चुकवण्यासाठी सट्टेबाजांनी एक हायटेक फंडा शोधून काढला आहे..त्यामुळे त्या सट्टेबाजांपर्यंत पोहचण्यात पोलिसांना ब-याच अडचणींना सामोरं जावं लागतोय....
सट्टा मुंबईत... पण त्याचं टेलिफोन एक्सचेंज पाकिस्तानात..होय...आता सट्टेबाजांनी हा नवीन फंडा शोधून काढलाय..कारण भारतात टेलिफोन एक्स्चेंजमुळे त्यांच भांड फुटण्याची शक्यता जास्त असते..पोलिसांनाही त्यांचा शोध घेण्यास जास्त वेळ लागत नाही...आणि त्यामुळेच सट्टेबाजांनी आता पाकिस्तानचा सहारा घेतला असून सट्टेबाजांच्या या नव्या कार्यपद्धतीचा नुकताच उलगडा झालाय..मुंबई पोलिसांनी काही दिवसांपूर्वी सोनू जालान, देवेंद्र कोठारी आणि फिरोज अन्सारी नावाच्या तीन सट्टेबाजांना केली..त्यांच्याकडं केलेल्या चौकशीत सट्टेबाजांचं पाकिस्तान कनेक्शन उघड झालं आहे.. ऐहतेशाम, जावेद,डॉक्टर जावेद आणि आरिफ हे चौघेजण पाकिस्तानातून सट्टेबाजीचं नेटवर्क चालवीत आहेत...ऐहत्तेशाम लाहोरमधून , जावेद आणि डॉक्टर जावेद हे दोघे कराचीतून तर आरिफ लाहोरमधून सट्टा चालवतोय...हे सट्टेबाज सट्टा चालविण्यासाठी ज्या पद्धतीचे गॅझेटचा वापर करत आहेत ते पाहून पोलीसही चक्रावून गेले आहेत..
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मुंबईत फिरोज अन्सारीच्या मोबाईलवर पाकिस्तानातून आलेला फोन कॉल डायव्हर्ट करुन तो सोनू जालान आणि देवेंद्र कोठारीच्या फोनवर पोहोचवला जात असे..तेथून तो इतर सट्टेबाजांशी संपर्क करुन सट्टा चालवित असे..पाकिस्तानातील या सट्टेबाजांना भारतात एन्ट्री मिळवून देण्यात कुख्यात छोटा शकीलचा हस्तक छोटे मियाने महत्वाची भूमिका बजावली होती..तसेच लाहोरचा सट्टेबाज आरिफ आणि मुबंईतील सट्टेबाज फिरोज अन्सारी यांच्यात त्यानेच ओळख करुन दिली होती...पुढे राजन टोळीने छोटे मियाची हत्या केली..पण तो पर्यंत सट्टेबाजांच्या पाकिस्तान कनेक्शनची पाळंमुळे रुजली होती..याच दरम्यान आणखी एक सट्टेबाजांच नेटवर्क तयार झालं नोमान आणि शोएब नावाच्या पाकिस्तानातील सट्टेबाजांच्या जोडी हे नेटवर्क चालवीत असून त्यांच्या कामाची पद्धत वेगळी होती..ते थेट भारतात कॉल न करता दुबईत आपल्या हस्तकाला कॉल करुन तो कॉल भारतात डायव्हर्ट केला जात असे....