बनावट नोट, खिशाला चाट

बनावट नोटा कुठून आणल्या जातात आणि त्या ओळखयाच्या कशा हे आम्ही तुम्हाला दाखविणार आहोत.. मात्र त्यापूर्वी पहाणार आहोत देशात कोणकोणत्या राज्यात बनावट नोटांचा साठा पोलिसांनी जप्त केलाय ते....सुरुवात बंगळुरु शहरातपासून करणार आहोत...बंगळुरु पोलिसांनी नुकताच बनावट नोटांचा साठा जप्त केलाय.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Sep 17, 2012, 11:27 PM IST

www.24taas.com, मुंबई
बनावट नोटा कुठून आणल्या जातात आणि त्या ओळखयाच्या कशा हे आम्ही तुम्हाला दाखविणार आहोत.. मात्र त्यापूर्वी पहाणार आहोत देशात कोणकोणत्या राज्यात बनावट नोटांचा साठा पोलिसांनी जप्त केलाय ते....सुरुवात बंगळुरु शहरातपासून करणार आहोत...बंगळुरु पोलिसांनी नुकताच बनावट नोटांचा साठा जप्त केलाय.
बनावट नोटांची तस्करी करणारी एक टोळी बंगळुरुमधील एका हॉटेलात उतरल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. बनावट नोटा चलनात आणण्याचा त्यांचा डाव होता...पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी हॉ़टेलावर छापा मारला...या छाप्य़ात त्यांनी ९जणांना जेरबंद केलं...
पोलिसांनी या छाप्यात पाचशे आणि हजाराच्या नोटा जप्त केल्या आहेत..पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ही टोळी २० ते ४० हजार रुपयांच्या बदल्यात एक लाख रुपयांच्या बनावट नोट देत असत.
बंगलुरु पोलिसांनी केलेल्या कारवाईत आरोपींकडून बनावट नोटांबरोबरच शस्त्रसाठाही जप्त केला आहे...या बनावट नोटा भारत-बांग्लादेश सीमावर्ती भागातून आणल्याचं प्राथमीक तपासात निष्पन्न झालं आहे..
तुम्ही तुमच्या टीव्ही स्क्रिनवर ज्या नोटा पहात आहात त्या ख-या असल्याचा तुमचा समज होण्याची शक्यता आहे..कारण या बनावट नोटाच त्या पद्धतीने तयार करण्यात आल्या आहेत..ख-या नोटांप्रमणे हुबेहुब या नोटा छापण्यात आल्या आहेत..
पोलिसांनी वेळीच छापामारुन या नोटा जप्त केल्यानसत्या तर अवघ्या काही तासात या बनावट नोटा विविध राज्यात चलनात आणण्यासाठी पाठविल्या गेल्या असत्या आणि एकदाका बनावट नोटा चलनात आल्या की त्यांना शोधून काढणं कठीण होवून बसतं..

केवळ बंगळुरुच नाही तर गुजरातमध्येही पोलिसांनी मोठ्या प्रमाणात बनावट नोटांचा साठा जप्त केलाय..गेल्या अनेक दिवसांपासून ती टोळी बनावट नोटा चलनात आणीत होती... पोलिसांनी त्याच्याकडून २६ लाख ७६ हजाराच्या बनावट नोटा जप्त केल्या आहेत..
बनावट नोटांचा हा साठा गुजरातच्या वेगवेगळ्या परिसरातून जप्त करण्यात आलाय..२६ लाख ७६ हजार रुपयांच्या बनावट नोटा गुजरातमध्ये चलनात आणल्या जाणार होत्या..त्यासाठी एका टोळीने खास तयारी केली होती..पोलिसांनी या प्रकरणी खोलात जाऊन तपास केल्यानंतर एक-एक धक्कादायक माहिती समोर येत गेली...आरोपी बाजारात वस्तू खरेदी करुन बनावट नोटा चलनात आणीत असतं..
बनावट नोटा चलनात आणणारी ही टोळी सुनियोजीतपणे आपलं नेटवर्क चालवीत होती..या टोळीतील लोक गुजरातच्या जूनागड,जामनगर तसेच अन्य परिसरात बनावट नोटा चलनात आणण्याचं काम करत होते..गुजरात पोलिसांनी या कारवाईत १४ जणांना अटक केलीय..आरोपींकड केलेल्या चौकशीतून अत्यंत महत्वाची माहिती पोलिसांच्या हाती लागलीय..
पोलिसांनी जप्त केलेल्या २६ लाख ७६ हजार रुपयांच्या बनावट नोटांमध्ये पाचशे आणि हजाराच्या नोटांचा समावेश आहे..ही टोळी ४० हजार रुपयांच्या बदल्यात एक लाखाच्या बनावट नोटांची विक्री करत होती...
ख-या नोटांप्रमाणेच या नोटांची बनावट असल्यामुळे सहजासहजी कोणाला शंका येत नाही..

गुजरात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ग्राफिक्स इन- बनावट नोटांचा अड्डा पाकिस्तान आणि दुबईमध्ये आहे..पाकिस्तान आणि दुबईतून बनावट नोटा बांग्लादेशात पाठविल्या जातात...आणि त्यानंतर पश्चिम बंगाल मार्गे त्या भारतातील विविध राज्यात चलनात आणण्यासाठी पाठविल्या जातात..

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बनावट नोटा एका ठिकाणाहून दुस-या ठिकाणी पाठविण्यासाठी तस्करांकडून मजुरांचा वापर केला जात आहे..तसेच त्यांच्या प्रवासाचं महत्वाचं साधन हे रेल्वे असल्याचं पोलिसांनी सांगितलंय...बंगलुरु पाठोपाठ गुरजातमध्येही बंनावट नोटांचा साठा जप्त केल्यामुळे तपास यंत्रणा सतर्क झाली असून बनावट नोटा चलणात आणणा-या तस्करांवर लगाम लावण्याचं आव्हाण त्यांच्या समोर उभ ठाकलं आहे..
देशाची राजधानी दिल्लीपासून ते मुंबईपर्यंत बनावट नोटांचा सूळसूळाट झालाय...त्याचं कारण म्हणजे अत्यंत योजनाबद्ध पद्धतीने तस्कर बनावट नोटा भारतात आणतात आणि त्यानंतर त्या आपल्या हस्तकांमार्फत चलनात आणल्या जातात..देशातील वेगवेगळ्या राज्यात पोलिसांनी केलेल्या कारवाईत ज्या बनावट नोटा जप्त केल्या आहेत तो आकडा थक्क करणारा आहे..
तुम्ही महाराष्ट्र राहात असाल तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची आहे.. तुमच्या खिशात असलेली नोट बनावट असण्याची शक्यता नाकारता येत नाही..
तुम्हाला घाबरवणं हा आमचा उद्देश नाही तर तुम्हाल सावध करणं हाच यामागचा आमचा हेतू आहे..थोड्याशा निष्काळज