डर्टी मोबाईल

मोबाईल फोन टॉयलेटपेक्षाही अस्वच्छ आहे. ऐकूण आश्चर्य वाटलं असलं तरी हे सत्य आहे. काय आहे डर्टी मोबाईल, याचा शोध घेण्याचा हा प्रयत्न.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Sep 4, 2012, 10:54 PM IST

www.24taas.com,मुंबई
शहरापासून ते शेताच्या बांदापर्यंत पोहोचलेलं तंत्रज्ञान अर्थात मोबाईल फोन.गरीब असो की श्रीमंत, मोबाईल प्रत्येकाकडं पाहायला मिळतो.पण हाच मोबाईल आज माणसासाठी धोकादायक ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण तुमचा मोबाईल फोन टॉयलेटपेक्षाही अस्वच्छ आहे. ऐकूण आश्चर्य वाटलं असलं तरी हे सत्य आहे. काय आहे डर्टी मोबाईल, याचा शोध घेण्याचा हा प्रयत्न.
मोबाईल.. आज प्रत्येक माणसाची हौस नाही तर गरज बनलाय.. पण हीच गरज आज त्याच्या आजारास कारण ठरतेय.. केवळ रेडिएशन पुरता हा धोका असेल असा जर तुमचा समज असेल तर तो तुमचा गैरसमज आहे.. कारण तुम्ही कधी स्वप्नातही विचार केला नसेल असो धोका तुम्हाला तुमच्या मोबाईलमुळे संभवू शकतो... विश्वास बसत नसेल तर पहा हा स्पेशल रिपोर्ट..
आज मोबाईल फोन म्हणजे जणू माणसाची सावलीच बनला आहे....तुम्ही जिथ-जिथं जाता ...तिथं तिथं तो तुमच्या सोबत असतो...आज मोबाईल शिवाय जीवन अशक्य होवून बसलं आहे....मोबाईल जवळ नसेल तर तुम्ही आम्ही बेचैन होतो... मोबाईल घरी विसरला तर चूकल्या चुकल्या सारखं वाटतं..मोबाईल जवळ असेल तर आवघं जग मुठीत असल्या सारखं वाटतं...मोबाईलचे अनेक फायदे असले तरी त्याच्यापासून होणा-या धोक्यांची अनेकांना आजही कल्पना नाही..
तुमचा मोबाईल फोन आहे अत्यंत अस्वच्छ !
टॉयलेटपेक्षाही अस्वच्छ आहे तुमचा मोबाईल फोन !
जिवणूंचं माहेरघर आहे तुमचा मोबाईल फोन !

होय, हे अगदी खरं आहे. तुमचा मोबाईल फोन अत्यंत अस्वच्छ आहे.टॉयलेट जेव्हडं अस्वच्छ असतं तेव्हडाच तुमचा मोबाईल फोन अस्वच्छ असू शकतो...तुमचा यावर विश्वास बसला नसेल तर तुमच्या या रोजच्या सवयीवर एक नजर टाका.
मोबाईल फोनची रिंग वाजली की कॉल घेण्यास तुम्ही जराही मागे पुढे पहात नाहीत. आपण कुठं आहोत याचा तुम्ही कधी विचार करत नाहीत...तुम्ही हात स्वच्छ करुन टॉयलेटच्या बाहेर पडता पण मोबाईल फोन स्वच्छ करण्या विषयी तुम्ही कधी विचार केलाय.
आपण आपल्या मर्जीनुसार वाटेल तिथ मोबाईल फोन ठेवतो. ती जागा स्वच्छ आहे की अस्वच्छ याचा कधीच विचार करत नाहीत.. अस्वच्छ जागी मोबाईल ठेवल्यामुळे त्याला जिवाणू चिकटतात..पण याचा कोणीच विचार करत नाही.
मोबाईलवर जमा झालेले जिवाणू तुमच्या शरीरात सहज प्रवेश करतात..त्यापासून तुम्हाला विविध प्रकारचे रोग होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

तुमच्या याच सवयींविषयी अमेरिकेच्या ऍरिझोना विद्यापीठाने एक संशोधन केलं आहे...त्या संशोधनातून जी माहिती उघड झाली ती अत्यंत धक्कादायक आहेत.
टॉयलेटपेक्षा अस्वच्छ बनलाय तुमचा मोबाईल. अमेरिकेच्या युनीवर्सिटी ऑफ एरिझोनानं केलेल्या संशोधनानुसार बहुतांशी लोक मोबाईल स्वच्छ करण्यास कंटाळा करतात.. आणि त्यांच्या याच सवयीमुळे मोबाईल हे अनेक आजारांचे माहेरघर बनलाय..त्या संशोधनात मोबाईलवर आढळून असलेल्या जिवाणूंमुळे डायरियासारख्या अनेक आजारांना तुम्हाला सामोर जावं लागण्याची शक्यता आहे.
मोबाईल.. हे केवळ संवाद साधण्याचा साधन बनलं असं नाही तर, इंटरनेट सर्फिंगपासून ते सोशल नेटवर्किंगसाईटवरुन कनेक्ट राहण्याचा राज मार्गचं बनलाय.. मोबाईल एक अशी गरज बनलाय , ज्याचा फार मोठ्या प्रमाणात आणि बेसमुर वापर केला जातोय.. क्षणाक्षणाला जगाशी संवादबद्ध राहण्याचं ते एक महत्वाचं साधन बनलंय.... पण त्याचा वापर करत असतांना जरा सावधान.
अमेरिकेच्या युनिवर्सिटी ऑफ ऍरिझोनाने केलेल्या संशोधनानुसार मोबाईल फोन हे जिवाणूचं माहेर घर बनलय..
बाईट- चार्ल्स गेरबा, माइक्रोबायोलॉजिस्ट, यूनिवर्सिटी ऑफ़ एरिज़ोना (या सर्वशोधांदरम्यानं आम्हाला समजलं की, मोबाईलमध्ये सर्वात जास्त जीवाणू असतात.. कारण मोबाईल आपल्या हाताच्या आणि तोंडाच्या जवळ असतात..)
मोबाईल फोनवर आढळून आले जिवाणू
स्युडोमोनास
स्टेफिलोकॉकस
ऍस्परगिलस
किलिफॉर्म्स
कॉली
बेसिलस
हे तेच जिवाणू , ज्यामुळे डायरियासारख्या गंभीर आजाराला निमंत्रण मिळतं.. हे सारे घातक जिवाणू मोबाईलवर आढळून असल्याच उघड झालय...मोबाईल फोनवर हे जिवाणू आढळून येण्याचं प्रमुख कारण म्हणजे मोबाईलच्या स्वच्छतेकडे केलेलं दुर्लक्ष.
मोबाईल फोन हा अनेक आजारांचं माहेरघर असल्याचं तुम्हाला माहित आहे का ? असा प्रश्न जेव्हा आम्ही मोबाईल वापरणा-या अनेकांना विचारला तेव्हा त्यांना याची जराही कल्पनाही नव्हती. जर आता पर्यंत तुम्हाला मोबाईलच्या या स