वाघ, राज आणि वनमंत्री

ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाचा दौरा केल्यानंतर मनसे प्रमुख राज ठाकरेंनी वाघ वाचवण्यासाठी पुढाकार घेतलाय..शिकारी टोळ्यांची माहिती देणा-यांना, तसंच शिका-यांवर कारवाई करणा-या वनखात्यातील कर्मचा-यांना, मनसेकडून बक्षिस दिलं जाणार आहे.

Updated: Jun 2, 2012, 12:04 AM IST

www.24taas.com, मुंबई

 

ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाचा दौरा केल्यानंतर मनसे प्रमुख राज ठाकरेंनी वाघ वाचवण्यासाठी पुढाकार घेतलाय..शिकारी टोळ्यांची माहिती देणा-यांना, तसंच शिका-यांवर कारवाई करणा-या वनखात्यातील कर्मचा-यांना, मनसेकडून बक्षिस दिलं जाणार आहे.

 

महारष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी वाघाची शिकार रोखण्यासाठी आता स्वत:चं पुढाकार घेतलाय.. चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबात व्य़ाघ्र प्रकल्पाला भेट दिल्यानंतर मनसे प्रमुखांनी नागपूरमध्ये ही घोषणा केली..गेल्या पाच महिन्यात ताडोबा अभय अरण्यात सतत  वाघाच्या शिकारीच्या घटना घडत आहेत...या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंनी थेट ताडोबा गाठलं आणि त्यांनी सगळ्या परिस्थितीची पहाणी केली...गेल्या तीन दिवसांपासून राज ठाकरे  विदर्भात तळ ठोकून होते...त्यांनी वनमंत्री पतंगराव कदम यांच्यावर  सडकून टीका केली..

राजकीय हस्तक्षेपामुळे वनखात्यातील अधिका-यांना काम करणं कठीण होऊन बसल्याचा आऱोप राज ठाकरेंनी केलाय. ताडोबाचा दौरा केल्यानंतर वनखात्यावर मनसे अध्यक्षांनी केलेल्या तिखट टीकेला  वनमंत्री पतंगराव कदमांनी अशा शब्दात उत्तर दिलंय. वनखात्याचा अनागोंदी कारभार लपून राहिला नसून या कारभारामुळेच अलिकडच्या काळात  वाघांना जीव गमवावा लागलाय..आणि हे सत्य वनमंत्रीही नाकारु शकणार नाहीत.

वाघ वाचवण्यासाठी मनसे प्रमुखांनी पुढाकार घेतलाय खरा, पण राज ठाकरेंचा ताडोबा दौरा चांगलाच गाजला...वनमंत्री पतंगराव कदम आणि राज ठाकरे यांच्या याच मुद्यावरुन कलगीतुरा रंगला होता. ताडोबा व्याघ्र प्रकल्पाच्या भेटीवरुन मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि वनमंत्री पतंगराव कदम यांच्यात असा वाद रंगला होता...ताडोबाला भेट देण्यासाठी राज ठाकरे बुधवारी चंद्रपूरमध्ये दाखल झाले होते...ताडोबा- अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या कोलारा प्रवेश द्वारातून त्यांच्या वाहनांचा ताफा आत शिरला..जंगलातील काही गावात थांबून त्यांनी ग्रामस्तांशी संवाद साधला..

 

वाघाची शिकार रोखण्यासाठी वनखात्याकडून बक्षिस योजना चालवली जातेय..त्याची जाहिरातही जंगलातील गावात करण्यात आलीय...पण त्याचा फारसा उपयोग होतांना दिसत नाही...जंगलातील पाणवठ्यावर सापळा लाऊन वाघाची शिकार केल्याच्या घटना नुकत्याच घडल्या आहेत...त्या शिकारी एक वाघ ठार  तर एक वाघ जायबंदी झालाय...ज्या ठिकाणी शिका-यांनी वाघाची शिकार केली होती त्या ठिकाणाची पहाणी राज ठाकरेंनी केली..ताडोबाच्या जंगलात राहणा-या ग्रामस्तांच्या  मदतीशिवाय  वाघ वाचविण्याच्या मोहीमेला यश येणार नसल्याची जाणीव सर्वांनाच आहे ..त्यामुळे वनखात्याकडून त्या दिशेनंही प्रयत्न केला जाण्याची आवश्यकता आहे...ताडोबातील वाघांची अवस्था पहाण्यासाठी  राज ठाकरे यांनी  दौरा केला खरा पण राजकीय वर्तुळात त्यांच्या दौ-या विषयी अनेक तर्कवितर्क लावले गेले....

 

वाघाची शिकार रोखण्यासाठी मनसेनं जाहीर केलेल्या बक्षीसामुळे शिकार रोखली जाणार का असा सवाल आता केला जाऊ लागलाय..वन्यजीव प्रेमींच्या म्हणण्यानुसार या बक्षीसामुळे शिका-यांची माहिती वनखात्याला मिळण्यास मदत होणार आहे..

 

वाघाची शिकार करणा-यांची खबर देणा-यांना दोन लाख तसेच शिका-यांवर कारवाई करणा-या वन अधिका-यांना पाच लाख रुपयांचं बक्षिस मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी जाहिर केलंय...महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून हे बक्षिस दिलं जाणार आहे...वाघ वाचविण्यासाठी राज ठाकरेंनी केलेल्य़ा या घोषणेचं वन्यजीवप्रेमींनी