बुलेट ट्रेन

परदेशाप्रमाणेच आता भारतातही ताशी साडेतीनशे किलोमीटर वेगाने धावणाऱ्या ट्रेनचं स्वप्न आता लवकरच सत्यात उतरणार आहे. मुंबई ते अहमदाबाद या दोन शहरांदरम्यान धावणारी बुलेट ट्रेन ही भारतातली पहिली बुलेट ट्रेन ठरणार आहे. केंद्राकडूनही या प्रस्तावाला हिरवा कंदील मिळालाय.

Updated: Jun 7, 2012, 10:49 PM IST

 

 

 

www.24taas.com 

परदेशाप्रमाणेच आता भारतातही ताशी  साडेतीनशे किलोमीटर वेगाने धावणाऱ्या ट्रेनचं स्वप्न आता लवकरच सत्यात उतरणार आहे. मुंबई ते अहमदाबाद या दोन शहरांदरम्यान धावणारी बुलेट ट्रेन ही भारतातली पहिली बुलेट ट्रेन ठरणार आहे. केंद्राकडूनही या प्रस्तावाला हिरवा कंदील मिळालाय. 

 

 

 

मुंबई-अहमदाबाद केवळ अडीच तासांत

मुंबई ते अहमदाबाद हे पाचशे किलोमीटरचं अंतर पार करण्यासाठी रेल्वे प्रवाशांना ७ तास लागतात. पण, या मार्गावर बुलेट ट्रेन सुरू झाली तर  मुंबईवरुन निघालेली ही ट्रेन केवळ  अडीच तासात  अहमदाबाद रेल्वे स्टेशनात पोहोचेल. मुंबई ते अहमदाबाद हे अंतर आहे ५०० किलोमीटर... सध्या मुंबईवरून निघालेल्या दुरांतो एक्सप्रेसला अहमदाबादला पोहचण्यासाठी लागतात ७ तास. पण बुलेट ट्रेनमुळे निम्म्यापेक्षा कमी वेळेत हे अंतर पार करणं शक्य होणार आहे. बुलेट ट्रेनचं स्वप्न लवकरच पूर्ण  होईल असा विश्वास  खुद्द पंतप्रधान मनमोहन सिंग यांनीच व्यक्त केलाय. देशाच्या आर्थिक परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधानांनी बुधवारी एक बैठक बोलावली होती. त्या बैठकीत मुंबई ते अहमदाबाद या बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी पंतप्रधानांनी ग्रीन सिग्नल  दिलाय. या योजनेसाठी तब्बल ६० हजार कोटी रुपयांची तरतूददेखील करण्यात आलीय. सुरुवातीला या ट्रेनचा वेग ताशी दोनशे किलोमीटर असणार आहे. मात्र पुढच्या काळात तो ताशी ३५० किलीमीटर पर्यंत वाढविण्याची योजना आहे.

 

 

 

‘व्हिजन २०२०’

‘व्हिजन २०२०’ अंतर्गत भारतात हाय-स्पीड ट्रेन चालविण्याची योजना आखण्यात आलीय. २००९मध्ये तत्कालीन रेल्वे मंत्री ममता बॅनर्जी यांनी संसदेत बजेट सादर करताना भारतीय रेल्वेच्या ‘मिशन २०२०’चा उल्लेख केला होता. यावेळी त्यांनी हायस्पीड रेल्वे सेवा सुरु करण्यात येणार असल्याचं जाहीर केलं होतं. या योजनेअंतर्गात देशातील सहा प्रमुख रेल्वे मार्गांवर हायस्पीड ट्रेन सुरू करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला होता. दिल्ली - चंदीगड – अहमदाबाद, दिल्ली - लखनऊ – पटना, पुणे - मुंबई – अहमदाबाद, हावडा – हाल्दीया, हैदराबाद – विजयवाडा – चेन्नई आणि चेन्नई – बंगळुरू – एर्नाकुलम या मार्गांचा त्यात समावेश आहे. ताशी अडीचशे किलोमीटर वेगाने धावण्यासाठी विशिष्ट प्रकारच्या रेल्वे ट्रॅकची आवश्यकता असते. हाय-स्पीड रेल्वेला थांबेही कमी असतात. तसेच रेल्वे ट्रॅकच्या आजूबाजूला मानवी वस्ती कमी असावी लागते. त्यासाठी विशिष्ट रेल्वे ट्रॅक निर्माण करावे लागणार आहेत.

 

 

 

योजना साध्य होणार? 

आपल्याकडं शताब्दी ही सर्वात  वेगवान ट्रेन समजली जाते. तिचा वेग ताशी १०० किलोमीटरचाही पल्ला गाठू शकत नाही. अशा या परिस्थीतीत २०० च्या वेगानं धावणारी बुलेट ट्रेन म्हणजे भारतीयांसाठी दिवस्वप्नचं. कारण सगळ्य