काही लागलं तर फोन करा... सांभाळून राहा, असे राज ठाकरेंनी मातोश्रीहून बाहेर पडताना आपला मोठा भाऊ आणि शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांना म्हटल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लिलावती हॉस्पिटलला जाऊन बाळासाहेब ठाकरेंची भेट घेतलीय. बाळासाहेब ठाकरेंना श्वसनाचा त्रास होत असल्यानं कालपासून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना प्रकृती अस्वस्थतेच्या कारणावरून लीलावती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलंय. पुढचे पाच दिवस तरी त्यांना हॉस्पिटलमध्येच ठेवण्यात येणार आहे. पण घाबरण्याचं काहीही कारण नसल्याचं डॉक्टरांचं म्हणणं आहे.
शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळालाय. त्यांची प्रकृती स्थिर आहे. 'मातोश्री' निवासस्थानी ते परतले आहेत. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी मिठाई वाट
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.