इमेजसाठी उमेदवार लागलेत वाचायला

निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर इच्छूक उमेदवार आता कसून तयारी करत असल्यानं पुस्तकांची विक्री चांगलीच वाढलीय. मतदारांसमोर चांगली इमेज निर्माण व्हावी यासाठी, संभाषण कौशल्य, व्यक्तीमत्व विकास, दिग्गजांची भाषणं या विषयावरील पुस्तकांना नाशकात चांगलीच मागणी वाढलीय.

Updated: Dec 20, 2011, 12:02 PM IST

झी २४ तास वेब टीम, नाशिक

निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर इच्छूक उमेदवार आता कसून तयारी करत असल्यानं पुस्तकांची विक्री चांगलीच वाढलीय. मतदारांसमोर चांगली इमेज निर्माण व्हावी यासाठी, संभाषण कौशल्य, व्यक्तीमत्व विकास, दिग्गजांची भाषणं या विषयावरील पुस्तकांना नाशकात चांगलीच मागणी वाढलीय.

राजकीय नेता म्हटलं की तो अडाणी, अशिक्षीत असणार असाच विचार सामान्य नागरिकांच्या मनात येतो. मात्र आता या परंपरागत विचारांना छेद देण्यासाठी इच्छूक उमेदवार सिद्ध झालेत. त्यासाठी उमेदवारांना आता पुस्तकं, ही मित्रासारखी वाटताहेत. प्रभाग क्रमांक २७  मधून इच्छ्क असलेला हा नंदन भास्कर पुस्तक प्रदर्शनातून वेगवेगळ्या पुस्तकांची निवड करतोय.

राजकीय क्षेत्रात वावरताना वेळेचं नियोजन, योग्य संदर्भ, संवाद कौशल्य गरजेचं आहे. त्यासाठी राजकीय अनुभवाबरोबरच पुस्तकी ज्ञानाची गरज उमेदवारांना भासू लागलीय.  इच्छुक उमेदवारांकडून पुस्तकांची मागणी वाढलीय. परिणामी सभेत कसे बोलाल ?, वक्तृत्वकला, राजकीय नेत्यांची भाषणं, नेतृत्वगुणांचा विकास या सारखी अनेक पुस्तकं बाजारात दाखल झाली आहेत.

मनसेनं इच्छुक उमेवारांची परीक्षा घेऊन नवा पायंडा पाडलाय. अर्थात त्यावर वेगवेगळी मतंही व्यक्त करण्यात आली. मात्र इच्छूक उमेदवारांमध्ये निर्माण झालेली ही जागृती राजकारण्यांची प्रतिमा उजळवण्यासाठीही तितकीच महत्वाची ठरणार यात शंका नाही.

[jwplayer mediaid="15898"]