आकर्षक व्यक्तिमत्त्व देतं भरगोस पगार!

दिसतं तसं नसतं... अशीच म्हण आपण लहानपणापासून ऐकत आलोय ना! पण, ही समजूत खोटी ठरवणारं एक अध्ययन नुकतंच प्रकाशित झालंय. कामाच्या ठिकाणी तुम्ही चांगले दिसत असाल, तुमचं व्यक्तीवत्त्व आकर्षक असेल तर पगाराच्या बाबतीत तुम्हाला त्याचा चांगला फायदा होऊ शकतो.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Mar 12, 2013, 01:09 PM IST

www.24taas.com, मुंबई
दिसतं तसं नसतं... अशीच म्हण आपण लहानपणापासून ऐकत आलोय ना! पण, ही समजूत खोटी ठरवणारं एक अध्ययन नुकतंच प्रकाशित झालंय. कामाच्या ठिकाणी तुम्ही चांगले दिसत असाल, तुमचं व्यक्तिमत्त्व आकर्षक असेल तर पगाराच्या बाबतीत तुम्हाला त्याचा चांगला फायदा होऊ शकतो.
‘संडे टाईम्स’ या वर्तमानपत्रानं प्रकाशित केलेल्या एका अध्ययनाद्वारे हा दावा करण्यात आलाय. नेहमी मरगळलेल्या अवस्थेत काम करणाऱ्या सहकाऱ्यांना इतरांपेक्षा २२ टक्के कमी पगार मिळत असल्याचा दावा या अहवालात करण्यात आलाय. हा निष्कर्ष केवळ पुरुषांना लागू होतो. मात्र, आकर्षक दिसणाऱ्या व्यक्ती कामात किती पुढाकार घेतात, याचा मात्र या अध्ययनात उल्लेख करण्यात आलेला नाही.
या अध्ययनाद्वारे संशोधकांच्या लक्षात आलंय की, कामाच्या ठिकाणी आपल्या चांगलं दिसण्यावर लक्ष न देणाऱ्या व्यक्तींना इतरांपेक्षा कमी पगार मिळतो. याचाच अर्थ असा होतो की मॅनेजमेंट तुमच्या दिसण्यावरही चांगलाच भर देतं. महत्त्वाचं म्हणजे, या महिलांच्या बाबतीत मात्र हे लागू होत नाही. म्हणजेच एखादी महिला सुंदर असेल तर तिचा पगार मात्र इतरांप्रमाणेच असतो. पुरुषांमध्ये गुड लुकींगचा फंडा केसांपासून पायांपर्यंत लागू होतो, मग तो कमी पगार घेणार असो किंवा जास्त... त्यामुळेच आता लोक आपण ‘प्रेझेंटेबल’ असल्याचा उल्लेखदेखील आपल्या ‘सीव्ही’मध्ये करू लागलेत.

या अध्ययनाचं काम १९८४ साली सुरू झालं होतं. तेव्हापासून हा ब्युटी ट्रेंड कायम असल्याचं लक्षात आलंय. संशोधकांचा अंदाज होता की, चांगलं दिसण्याचा फायदा महिलांना जास्त होत असेल... त्यांना जास्त पगार मिळत असेल. पण या अध्ययनानं मात्र त्यांनी स्वत:च हे मत बदलायला भाग पाडलंय.