बारावीचा निकाल जाहीर, कोकण विभागाची बाजी

बारावी परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला असून नऊ विभागातून कोकण टॉपला आहे. राज्याचा निकाल ८६.६० लागलाय. 

Updated: May 25, 2016, 12:04 PM IST
बारावीचा निकाल जाहीर, कोकण विभागाची बाजी title=

मुंबई : बारावी परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला असून नऊ विभागातून कोकण टॉपला आहे. राज्याचा निकाल ८६.६० लागलाय. यामध्ये विद्यार्थ्यांनी बाजी मारली आहे. सर्वाधिक मुली उत्तीर्ण झाल्यात.

सर्वात जास्त कोकण तर सर्वात कमी निकाल नाशिकचा लागला आहे. सलग कोकण विभागाने निकालात बाजी मारल्याचे दिसून येत आहे. त्यानंतर कोल्हापूर दोन क्रमांकावर आहे. तिसऱ्या क्रमांकावर औरंगाबाद असून पाचव्या क्रमांकावर मुबंई बोर्ड आहे. तर कमी निकाल हा नाशिकचा लागला आहे. बारावीची फेर परीक्षा जुलै-ऑगस्टमध्ये होणार आहे.

बारावीचा निकाल जाहीर

राज्य - ८६.६० टक्के
कोकण - ९३.२९ टक्के
कोल्हापूर - ८८.१० टक्के
औरंगाबाद - ८७.८० टक्के
पुणे - ८७.२६ टक्के
मुंबई - ८६.०८ टक्के
लातूर - ८६.२८ टक्के
नागपूर - ८६.३५ टक्के
अमरावती - ८५.८१ टक्के
नाशिक - ८३.८९ टक्के

विज्ञान शाखेचा निकाल ९३.१६ टक्के, वाणिज्य शाखेचा निकाल ८९.१० टक्के तर कला शाखेचाचा निकाल ७८.११ टक्के लागला. राज्य मंडळातर्फे आज दुपारी १ वाजता ऑनलाइन निकाल प्रसिध्द केला जाईल. विद्यार्थ्यांना निकालाची मूळ प्रत येत्या ३ जून  रोजी दुपारी ३ वाजता संबंधित महाविद्यालयात वितरित केली जाईल, असे राज्य मंडळाचे अध्यक्ष गंगाधर म्हमाणे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

निकाल येथे उपलब्ध

१. www.mahresult.nic.in
२. www.result.mkcl.org
३. www.maharashtraeducation.com
४. http://maharashtra12.knowyourresult.com
५. www.rediff.com/exams
६. http://maharashtra12.jagranjosh.com