झी 24 तास वेब टीम, मुंबई
महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) २०१२ साली घेण्यात येणा-या विविध स्पर्धा परीक्षांच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. केंद्रीय लोकसेवा दरवर्षी संपूर्ण वर्षाचे वेळापत्रक वर्षाच्या सुरुवातीला देण्यात येत आहे.
राज्यसेवा परीक्षा
जाहिरात प्रकाशित/अर्ज भरणं - डिसेंबर २०११
पूर्व परीक्षा -१२ फेब्रुवारी २०१२ (वस्तुनिष्ठ, बहुपर्यायी)
मुख्य परीक्षा - १५ मे २०१२ पासून (लेखी परीक्षा)
पात्रता : अंतिमवर्ष पदवी किंवा पदवी प्राप्त उमेदवार
पोलीस उपनिरीक्षक परीक्षा
ही परीक्षा पूर्वपरीक्षा, मुख्यपरीक्षा, शारीरिक चाचणी व मुलाखत या टप्प्यांतून होते.
जाहिरात प्रकाशित/अर्ज - फेब्रुवारी
पूर्वपरीक्षा - २२ एप्रिल २०१२ (वस्तुनिष्ठ बहुपर्यायी)
मुख्यपरीक्षा - २२ जुलै २०१२ (वस्तुनिष्ठ बहुपर्यायी)
पात्रता : पदवीच्या अंतिम वर्षाला असणारे वा पदवी उत्तीर्ण उमेदवार
विक्रीकर निरीक्षक
राज्य शासनाच्या उत्पन्नचा मोठा भाग म्हणजे विक्रीकर.
जाहिरात प्रकाशित/अर्ज - मार्च २०१२
पूर्वपरीक्षा - १३ मे २०१२ (वस्तुनिष्ठ बहुपर्यायी)
मुख्यपरीक्षा - १९ ऑगस्ट २०१२ (वस्तुनिष्ठ बहुपर्यायी)
पात्रता : अंतिम वर्ष पदवी वा पदवी उत्तीर्ण उमेदवार
सहाय्यक परीक्षा
जाहिरात प्रकाशित/अर्ज - एप्रिल २०१२
पूर्वपरीक्षा - १७ जून २०१२
मुख्यपरीक्षा - ९ सप्टेंबर २०१२
पात्रता : वरीलप्रमाणे
महाराष्ट्र वनसेवा परीक्षा
या परीक्षेसाठी लेखी परीक्षा (गुण - ८००) व मुलाखत (गुण-१००) असे तीन टप्पे आहेत. मुख्य परीक्षेत मराठी, इंग्रजी, सामान्यज्ञान-गणित व दोन वैकल्पिक विषयांचा समावेश असतो.
जाहिरात प्रकाशित/अर्ज - नोव्हेंबर २०११
परीक्षा - १५ जानेवारी २०१२
पुढीलपैकी एका विषयातील पदवी उत्तीर्ण असणं आवश्यक रसायनशास्त्र, वनशास्त्र, वनस्पतीशास्त्र, भूशास्त्र, गणित, भौतिकशास्त्र, संख्याशास्त्र, प्राणीशास्त्र.
महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा (गट अ)
जाहिरात अर्ज - नोव्हेंबर २०११
पूर्वपरीक्षा - जानेवारी २०१२
मुख्यपरीक्षा - एप्रिल २०१२
पात्रता : अभियंत्रिकी पदवीधर
दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठस्तर व प्रथम वर्ग न्यायाधीश परीक्षा
जाहिरात - जुलै २०१२
पूर्वपरीक्षा - सप्टेंबर २०१२
मुख्यपरीक्षा - डिसेंबर २०१२
कायद्याची पदवी (किमान ५५ )
पात्रता : इंग्रजी आणि मराठीचे उत्तम ज्ञान
अधिक माहितीसाठी www.mpsc.gov.in ही वेबसाईट पहावी.