धडाकेबाज क्रिकेटर युवी झाला खूश

भारताचा यंगस्टार क्रिकेटर युवराज सिंग हा भलताच खूश आहे. भारतीय अ संघाचे नेतृत्व करताना सराव सामन्यात तडाकेबाज शतक ठोकले. हे शतक आपल्यासाठी खास आहे, अशी त्यांने प्रतिक्रिया दिली आहे.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Sep 17, 2013, 12:06 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, बंगळूर
भारताचा यंगस्टार क्रिकेटर युवराज सिंग हा भलताच खूश आहे. भारतीय अ संघाचे नेतृत्व करताना सराव सामन्यात तडाकेबाज शतक ठोकले. हे शतक आपल्यासाठी खास आहे, अशी त्यांने प्रतिक्रिया दिली आहे.
पुनरागमनाच्या पहिल्याच सामन्यात वेस्ट इंडिज अ संघाविरुद्ध हे धडाकेबाज शतक ठोकले. वेस्ट इंडिजविरुद्ध दर्जेदार खेळी झाल्याने युवी खुश आहे. ही खेळी आंतरराष्ट्रीय दर्जाची होती. मोसमातल्या पहिल्याच सामन्यात शतक झळकावणे माझ्यासाठी खास होते. खेळाचा मोसम चालू नसताना मी माझ्या फलंदाजीवर मेहनत घेतली. त्यात मी यशस्वी झालो आहे, असे युवीने म्हटलेय.
कर्णधार युवीने शतक ठोकले नाही तर त्याच्या या शतकामुळे वेस्टइंडिजवर विजय मिळविण्यासाठी हे शतक मोलाचे ठरले. युवराजने यावेळी वेस्टइंडिजच्या गोलंदाजांचेही कौतुक केले. आंद्रे रसेल याने इंडिजच्या बाजूने चांगली खेळी केली, तसेच बीटन हा वेस्ट इंडिजचा भविष्यातील जलदगती गोलंदाज आहे. त्याच्यावरून मला कर्टली अँब्रोसची आठवण येते.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.