जागतिक कुस्ती स्पर्धा: भारताच्या अमितकुमारला रौप्यपदक

जागतिक कुस्ती स्पर्धेतील ५५ किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीत धडक मारणाऱ्या आशिया चॅम्पियन अमितकुमारनं रौप्यपदक जिंकलंय.

Aparna Deshpande Aparna Deshpande | Updated: Sep 17, 2013, 09:42 AM IST

www.24taas.com , झी मीडिया, बुडापेस्ट
जागतिक कुस्ती स्पर्धेतील ५५ किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीत धडक मारणाऱ्या आशिया चॅम्पियन अमितकुमारनं रौप्यपदक जिंकलंय.
अंतिम फेरीत इराणच्या हसन फरमान रहीमीविरुद्धच्या सामन्यात अमितकुमारचा पराभव झाला. मात्र अंतिम फेरीत धडक मारल्यामुळं त्यानं रौप्यपदकावर आपलं नाव कोरलं. याआधी २०१० मध्ये सुशीलकुमारनं जागतिक कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदक जिंकलं होतं.
सातवं रँकिंग असलेल्या अमितकुमारनं उपांत्य फेरीत तुर्की प्रतिस्पर्ध्याला धुळ चाटवत अंतिम फेरीत धडक मारली. २० वर्षीय अमितनं त्याआधी आपल्या जापनीज, फ्रेंच, अमेरिकी प्रतिस्पर्ध्यांना सहज लोळवलं. पहिल्या फेरीत त्यानं जपानच्या यासूहिरो इनाबाला तर दुसऱ्या फेरीत फ्रान्सच्या झोरेअल क्वॅरॅकला हरवलं. पहिल्याच फेरीत त्यानं आपल्या प्रतिस्पर्ध्यांना हरवून प्रतिस्पर्ध्यांपेक्षा सात गुण अधिक पटकावले. उपांत्य फेरीत त्यानं अमेरिकेच्या अँजेल अलेस्मो एक्सोबेडो यांला हरवलं.
लंडन ऑलिंपिकमध्ये रौप्यपदक जिंकणारा सुशीकुमार खांद्याच्या दुखापतीमुळं यंदाच्या जागतिक कुस्ती स्पर्धेत सहभागी झाला नाही. पण अमितकुमारच्या शानदार कामगिरीमुळं भारतीय कुस्तीप्रेमींना पुन्हा एकदा जल्लोष करण्याची संधी मिळाली.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.