www.24taas.com, ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई
इंग्लंडमध्ये झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीचं विजेतेपद टीम इंडियाने पटकावल्यानंतर... जगभरातून कॅप्टन धोनीवर स्तुतिसुमनांचा वर्षावच सुरू झाला... एकामागोमाग एक विक्रमांचे इमले उभारणा-या धोनीच्या पाठीवर माजी भारतीय कॅप्टन्सनीही कौतुकाची थाप मारली आहे... सौरव गांगुलीने धोनीशी तुलना करण्यास स्पष्ट नकार देताना, धोनी हा उत्कृष्ट कॅप्टन असल्याचं मान्य केलं आहे...
आंतरराष्ट्रीय क्रिकेट वर्तुळात सध्या धोनी नामाचाच उदो सुरू असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे... आधी टी-20 चॅम्पियनशीप... त्यानंतर टेस्टमध्ये नंबर वन रँकिंग... पाठोपाठ वन-डे वर्ल्ड कप जेतेपद.. आणि या सर्व जेतेपदांनंतर इंग्लंडमध्ये झालेला मिनी वर्ल्ड कप अर्थात चॅम्पियनशीप ट्रॉफीचं विजेतेपद.. म्हणजे सोन पे सुहागाच... धोनीच्या कल्पक नेतृत्वाच्या जोरावर टीम इंडिया अख्खं क्रिकेटविश्व पादाक्रांत करण्यास निघाली आहे...
धोनीचा हा आवेश पाहून त्याची इतर भारतीय कॅप्टन्सशी तुलना झाली नसती तरच नवल वाटलं असतं... भारतीय क्रिकेटमध्ये आक्रमकता आणणा-या कॅप्टन सौरव गांगुलीसारखी धोनीची शैली असल्याचं वक्तव्य अनेक क्रिकेट पंडितांनी केली... मात्र धोनी आणि माझ्यात तुलना होणं अशक्य असल्याचं मत व्यक्त करताना.... या सर्व तुलनात्मक चर्चांना स्वत: गांगुलीने पूर्णविराम लगावला आहे... असं असलं तरी त्याने धोनीच्या कल्पक नेतृत्वावर मात्र स्तुतिसुमने उधळली आहेत...
धोनी हा एक उत्कृष्ट कॅप्टन आहे... त्याच्यामध्ये आणखीन बरंचसं क्रिकेट शिल्लक असून, भविष्यात तो आणखीन चमत्कार करून दाखवू शकतो, असे सौरव गांगुलीने म्हटले आहे.
क्रिकेटच्या तिन्ही फॉर्म्याटमध्ये टीमला अजिंक्यपद मिळवून देणारा धोनी जगातील एकमेव कॅप्टन ठरला आहे... सध्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरलेल्या कॅप्टन धोनीचं भारताची वॉल अशी ओळख असणा-या राहुल द्रविडनेही कौतुक केलं आहे... इतकंच नाही तर त्याने टीम इंडियावरही कौतुकांचा वर्षाव केला आहे...
भारताची ही सर्वोत्तम टीम आहे. महत्त्वाच्या क्षणी दबाव झुगारत त्यांनी खेळ उंचावला. टीम इंडिया संतुलित असून, त्यांची फिल्डिंगही जबरदस्त झाली असल्याचे माजी कर्णधार राहुल द्रविडने सांगितले.
चॅम्पियन्स ट्रॉफीवर नाव कोरल्यानंतर भारतीय टीमसमोर आव्हान असणार आहे ते.. वेस्ट इंडिजमध्ये होऊ घातलेल्या ट्रायंग्युलर सीरिजचे... इंग्लंडमधील वातावरणाच्या उलट असणा-या कॅरेबियन बेटांवर आता धोनीब्रिगेड आणखीन काय चमत्कार करते याचीच उत्सुकता फॅन्ससह दिग्गजांनाही नक्कीच लागलेली असणार...
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.