सचिनची `फेअरवेल` मॅच वानखेडेवरच...

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची 200 वी टेस्ट मुंबईत खेळवण्यावर बीसीसीआयने शिक्कामोर्तब केलं... आणि सचिनची आई रजनी तेंडुलकरचं वानखेडेवर मुलाला खेळताना पाहण्याचं स्वप्न साकार झालं...

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Oct 15, 2013, 01:24 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची 200 वी टेस्ट मुंबईत खेळवण्यावर बीसीसीआयने शिक्कामोर्तब केलं... आणि सचिनची आई रजनी तेंडुलकरचं वानखेडेवर मुलाला खेळताना पाहण्याचं स्वप्न साकार झालं... आपल्या क्रिकेट करिअरला मुंबईच्या वानखेडेवर सुरूवात करणा-या सचिनने मुंबईतच आपल्या करिअरची अखेरची मॅच खेळावी अशी इच्छा रिटायरमेंटच्या घोषणेवेळी केली होती..
क्रिकेटचा महामेरू... विक्रमांचा बादशाह... भारतीय क्रिकेटचा देव... अशी एक ना अनेक बिरूदं मिरवणा-या मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या आंतरराष्ट्रीय करिअरला लवकरच फुलस्टॉप लागणार आहे... मायदेशात विंडिजविरूद्ध रंगणा-या टेस्ट सीरिजमध्ये सचिन विक्रमी 200वी टेस्ट खेळणार आहे... आणि याच टेस्टनंतर सचिनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा करण्याचा निर्णय घेतला... मुंबईतून आपल्या करिअरची सुरूवात करणा-या सचिनने करिअरची अखेरची मॅच होमग्राऊंडवरच खेळावी अशी इच्छा व्यक्त केली होती... त्याच्या क्रिकेटमधील योगदानाला मान देत बीसीसीआयनेही सचिनच्या 200व्या टेस्टकरता मुंबईचं दार उघडलं... आणि सचिनच्या ग्रँड रिटायरमेंटचा मार्ग मोकळा झाला... सचिनच्या या अखेरच्या टेस्टकरता त्याची आई रजनी तेंडुलकरचीही स्टेडियममध्ये विशेष उपस्थिती असणार आहे... आईची तब्येत बरी नसल्याने अखेरची टेस्ट मुंबईतच खेळवा अशी विनंतीही सचिनने बीसीसीआयला पत्र पाठवून केली होती...
करिअरची सुरूवात ज्या जागेहून होते त्याच जागी अखेर करण्याची संधी काही भाग्यवंतानाच मिळते अशी प्रतिक्रीयाही माजी क्रिकेटर्सने व्यक्त केली. विक्रमवीर मास्टर ब्लास्टरला शेवटचं आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळताना पाहण्याकरता फॅन्स मोठ्या संख्येने स्टेडियममध्ये उपस्थिती लावणार यांत निश्चितच शंका नाही... आतापर्यंत आपल्या बॅटने आंतरराष्ट्रीय क्रिकेट गाजवणा-या सचिनची बॅट शेवटच्या मॅचमध्येही तळपावी... आणि त्याने आणखी एक सेंच्युरी झळकवावी अशी इच्छा तमाम फॅन्स उराशी बाळगून असणार...

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.