अशी झाली स्पॉट फिक्सिंग, पोलिसांचा खुलासा

स्पॉट फिक्सिंग प्रकरणी दिल्ली पोलिसांनी धक्कादायक खुलासे करून या प्रकरणाचा पर्दाफाश केला आहे. एक ओव्हर फिक्स करण्यासाठी सुमारे साठ लाख रुपये घेतल्याची धक्कदायक पुरावे दिल्ली पोलिसांनी आज पत्रकार परिषदेत सादर कले.

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: May 16, 2013, 03:59 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
स्पॉट फिक्सिंग प्रकरणी दिल्ली पोलिसांनी धक्कादायक खुलासे करून या प्रकरणाचा पर्दाफाश केला आहे. एक ओव्हर फिक्स करण्यासाठी सुमारे साठ लाख रुपये घेतल्याची धक्कदायक पुरावे दिल्ली पोलिसांनी आज पत्रकार परिषदेत सादर कले.
अजित चंदेलिया, शांताकुमार श्रीसंत आणि अंकित चव्हाण यांचे आणि बुकींमध्ये झालेले संवादाचे पुरावे आणि व्हिडिओ क्लिपिंगद्वारे दिल्ली पोलिसांनी स्पॉट फिक्सिंगचा पर्दाफाश केला आहे. कोडवर्डच्या आधारे स्पॉट फिसिंग करण्यात येत असल्याचे दिल्ली पोलिसांनी उदाहरणासह स्पष्ट केले.
अजित चंदेलियाचे फिक्सिंग
जयपूर येथे ५ मे रोजी पुणे वॉरिअर्स आणि राजस्थान यांच्यात सामना झाला. त्या अगोदर अजित चंदेलिया आणि बुकी यांच्यात संभाषण झाले. त्यानुसार चंदेलियाने दुसऱ्या ओव्हरमध्ये १४ आणि त्यापेक्षा अधिक धावा देण्याचे फिक्स केले. त्यात त्याने बुकीला संकेत देण्याचे ठरले होते. संकेतानुसार चंदेलियाने टी शर्ट वर करायचे होते. परंतु चंदेलियाने दुसऱ्या ओव्हरमध्ये संकेतच दिले नाही. पण ठरल्याप्रमाणे १४ रन्स दिले. पण मॅचनंतर बुकी आणि चंदेलिया यांच्यात वाद झाला की संकेत न दिल्यामुळे आम्ही पैसा लावला नाही. म्हणून सुरूवातीला दिलेले २० लाख रुपये परत करण्याचे बुकीने सांगितले.
या सामन्यातील एका ओव्हरसाठी ४० लाख रुपये फिक्स झाले होते. त्यातील २० लाख अडव्हान्स दिले होते.

श्रीसंतचे फिक्सिंग
मोहाली येथे ९ मे रोजी पंजाब आणि राजस्थान यांच्यात सामना झाला. त्यापूर्वी श्रीसंत आणि बुकी यांच्यात संभाषण झाले. त्यानुसार श्रीसंतने दुसऱ्या ओव्हरमध्ये १४ आणि त्यापेक्षा अधिक रन्स देण्याचे फिक्स केले. त्यात बुकीला संकेत देण्याचे ठरले. संकेतानुसार श्रीसंतने आपल्या दुसऱ्या ओव्हरमध्ये पॅन्टच्या समोर टॉवेल लावायचा आणि १४ रन्स द्यायचे. यासाठी श्रीसंतला ४० लाख रुपये देण्यात आले.
श्रीसंतने या सामन्यात पहिल्या ओव्हरमध्ये पॅन्टसमोर टॉवेल लावला नाही आणि फिक्स ओव्हरमध्ये त्याने टॉवेल लावला. याचा पुरावाही पोलिसांनी व्हिडिओ क्लिपच्या माध्यमातून दाखविला.
अंकीत चव्हाणचे फिक्सिंग
मुंबई येथे १५ मे रोजी मुंबई आणि राजस्थान यांच्यात सामना झाला. या सामन्यात अजित चंदेलिया खेळला नाही. पण त्याने अंकित चव्हाण आणि बुकी यांच्या मध्यस्थाची भूमिका निभावली. फिक्स ओव्हरसाठी ६० लाख रुपये ठरले. त्यानुसार अंकितने दुसऱ्या ओव्हरमध्ये १४ आणि त्यापेक्षा अधिक रन्स देण्याचे फिक्स केले. त्यात बुकीला संकेत देण्याचे ठरले. संकेतानुसार अंकीत आपला रिस्ट बँड फिरवेल असे ठरले.
अंकित चव्हाणने पहिल्या ओव्हरमध्ये केवळ २ रन्स दिले. पण त्याने दुसऱ्या ओव्हरमध्ये १५ रन्स दिले. पहिल्या तीन चेंडूत त्याने १४ धावा दिल्या. आणि उरलेल्या ३ चेंडूत एक धाव दिली.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.