पोलिसांनी श्रीसंतसह तीन खेळाडूंचा बुरखा फाडला

आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणी आज नवी दिल्ली पोलिसांनी राजस्थान रॉयलच्या तीन खेळाडूंना अटक केलं. तर ७ बुकींनाही केली अटक.

Updated: May 16, 2013, 03:48 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणी आज नवी दिल्ली पोलिसांनी राजस्थान रॉयलच्या तीन खेळाडूंना अटक केलं. तर ७ बुकींनाही केली अटक. यावरच दिल्ली पोलिसांनी घेतली पत्रकार परिषद आणि केला या खेळाडूंचा पर्दाफाश.
- नवी दिल्ली : स्पॉट फिक्सिंग प्रकरणी दिल्ली पोलिसांची पत्रकार परिषद |
- तीन खेळाडूंसहित ११ सट्टेबाजांना केली अटक
- मुंबई आणि मोहालीच्या मॅचमध्ये झाली होती फिक्सिंग – पोलीस
- इशाऱ्यावरून केली जात होती फिक्सिंग | अजित चंडालिया इशारा करायला विसरला |
- लॉकेट फिरवणं तसंच टी-शर्टवर करून दिले जात होते इशारे

- दिल्ली पोलिसांनी व्हिडिओ क्लिपद्वारे सादर केले पुरावे
- अजित चंदालिया एका ओव्हरमध्ये १४ रन देण्याचं केलं होतं बुकींना कबूल
- एका ओव्हरमध्ये दिले १४ रन, प्रत्येक बॉलमागे लाखो रूपये खेळाडूंना
- घड्याळ दाखवणं - हा होता कोडवर्ड
- एका ओव्हरसाठी ठरवले होते ६० लाख रुपये
- खेळा़डूंनी केलं स्पॉट फिक्सिंग, दिल्ली पोलिसांना दाखवली व्हिडिओ
- बुकी - खेळाडुंमध्ये झालेल्या संभाषणाची ऑडिओ टेप पोलिसांच्या हाती
- अंकीतनं रिस्टबँण्ड हलवून दिला बुकींना इशारा
- मॅचच्या अगोदरचं पोलिसांना मिळाली होती फिक्सिंगची माहिती
- जयपूर, मोहाली, मुंबईच्या मॅच होत्या फिक्स

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.