भारताच्या लंचपर्यंत ४ बाद २६३ रन्स

टीम इंडियाचा डाव सचिन तेंडुलकर आणि विराट कोहली या जोडीने सावरला. दोघांच्या अर्धशतकाच्या जोरावर भारताने आज रविवारी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यातील तिसऱ्या दिवशी लंचपर्यंत ४ बाद २६३ रन्स केल्या.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Feb 24, 2013, 12:35 PM IST

www.24taas.com, चेन्नई
टीम इंडियाचा डाव सचिन तेंडुलकर आणि विराट कोहली या जोडीने सावरला. दोघांच्या अर्धशतकाच्या जोरावर भारताने आज रविवारी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यातील तिसऱ्या दिवशी लंचपर्यंत ४ बाद २६३ रन्स केल्या.

सचिन तेंडुलकरने चांगली फलंदाजी केली. त्याला साथ दिली ती विराट कोहलीने. मात्र, ही जोडी मैदानात चांगला खेळ करत असताना सचिन तेंडुलकर विचित्र पद्धतीने आऊट झाला. नॅथन लिऑनच्या गोलंदाजीवर फटका मारताना बॅटची कडा घेऊन बॉल स्टंपवर आदळला आणि सचिन बोल्ड झाला. त्यानंतर कोहली आणि धोनीने डाव सावरत धावसंख्या अडीचशेच्या पार नेली.

लंचपर्यंत खेळ थांबला तेव्हा भारताच्या ४ बाद २६३ रन्स झाल्या होत्या. कोहली ८३ तर धोनी ३७ धावांवर खेळत होते. टीम इंडिया अजून ११७ धावांची पिछाडीवर आहे.
दुसऱ्या दिवशी सकाळी ऑस्ट्रेलियाचा डाव झटपट संपविण्यात भारतास अपेक्षित यश आले नाही. मायकेल क्लातर्क १३० रन्सवर बाद झाल्यामुळे ऑस्ट्रेलियास ३८० पर्यंतच मजल मारता आली.