www.24taas.com, झी मीडिया, मिरपूर
बांग्लादेशमध्ये सुरु असलेल्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये भारत विरूद्ध वेस्ट इंडिज सामना झाला. या सामन्यात विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी केलेल्या अर्धशतकाच्या जोरावर तीन गड्यांच्या मोबदल्यात 130 रन्स करत आपला दुसरा विजय साजरा केला.
भारताने टॉस जिंकून वेस्ट इंडिजला बॅटिंगसाठी पाचारण केले. वेस्ट इंडिजच्या संघाने 129 रन्स केल्या. दिलेले आव्हान भारतीय संघाने 3 गडी गमावत गाठले. शेवटच्या षटकामध्ये युवराज सिंग बाद झाला आणि हुरहुर वाढली होती. तरीही भारताचा विजय होणार असल्याचे विजयी जल्लोष पाहायला मिळाला.
रोहित शर्माने 62 रन्स केल्यात. तर, विराट कोहलीने 54 रन्स केल्याने भारताचा विजय होणार असल्याचे निश्चित झाले. सलामीला आलेला शिखर धवन सॅम्यूअल बद्रीच्या चेंडूवर पायचीत होऊन शून्यावर तंबूत परतला. तर, विराटने अर्ध शतक पूर्ण झाल्यावर काही वेळातच तो त्रिफळाचीत झाला. ख्रिस गेलने युवराज सिंगचा झेल घेत त्याला तंबूत पाठवले. रोहित शर्माने आत्मविश्वासाने खेळी करत भारताच्या विजयात मोलाचे सहकार्य केले.
स्मितने 11 रन्स केल्यात त्याला अश्विनने बाद केले. ख्रिस गेलला जीवदान मिळूनही फारशी चमक दाखवू शकला नाही. तो 34 रन्सवर रनआऊट झाला. सामीने चेंडू फेकत धोनीने आऊट केले. सिमसन्सने 27 रन्स केल्यात त्याला रवींद्र जडेजाने तंबूत पाठविले. सॅम्युअलने 18 रन्स केल्यात. रवींद्र जडेजाने 3 तर अमित मिश्राने दोन विकेट घेतल्या.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.