भारताचं स्वप्न भंगलं, श्रीलंकेनं जिंकला टी-२० वर्ल्डकप

दुसऱ्यांदा टी-२0वर्ल्ड कप जिंकण्याच टीम इंडियाचं स्वप्न भंगलंय. बांग्लादेशमध्ये झालेल्या टी-२० वर्ल्डकपच्या फायनलमध्ये भारताला ६ विकेट्सनं पराभूत करत श्रीलंकेनं टी-२० वर्ल्डकपला गवसणी घातली आहे.

Aparna Deshpande Aparna Deshpande | Updated: Apr 6, 2014, 10:24 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मिरपूर
दुसऱ्यांदा टी-२0वर्ल्ड कप जिंकण्याच टीम इंडियाचं स्वप्न भंगलंय. बांग्लादेशमध्ये झालेल्या टी-२० वर्ल्डकपच्या फायनलमध्ये भारताला ६ विकेट्सनं पराभूत करत श्रीलंकेनं टी-२० वर्ल्डकपला गवसणी घातली आहे.
टीम इंडियानं श्रीलंकेसमोर विजयासाठी १३१ रन्सचं टार्गेट ठेवलं होतं. श्रीलंकेनं हे आव्हान १८ ओव्हर्समध्येच ४ विकेट्स गमावत पार केलं आणि पहिल्यांदाच टी-२० वर्ल्डकपवर आपलं नाव कोरलं.
लंकेकडून कुमार संगकारानं हाफसेंच्युरी झळकावली. तर महेला जयवर्धनेने २४ रन्स केल्या. टी-२० क्रिकेटमधून संगकारा आणि जयवर्धनेचा हा निवृत्तीपूर्वीचा अखेरचा सामना होता. या दोन्ही ज्येष्ठ क्रिकेटपटूंनी श्रीलंकन टीमनं विजयी निरोप दिलाय.
दरम्यान, युवराज सिंगनं या मॅचमध्येही सर्वांची निराशा केली. त्यानं २१ बॉल्समध्ये केवळ ११ रन्स केले. युवीची कामगिरी निराशाजनकच होती. तर दुसरीकडे भारतीय बॉलर्सनाही आज कमाल करता आली नाही.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.