www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
टी-२० वर्ल्ड कपच्या सुपर १० च्या पहिल्या सामन्यात पाकिस्तानने भारतासमोर १३१ धावांचे आव्हान ठेवले आहे. पाकिस्तानकडून उमर अकमल याने सर्वाधिक ३३ धावा केल्या. भारताकडून आमित मिश्रा याने सर्वाधिक दोन विकेट घेतल्या.
भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. गोलंदाजी करताना भारतीय गोलंदाजींनी पाकिस्तानी खेळाडूंना चांगले बांधून ठेवले. भारताकडून अमित मिश्रा २, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद सामी आणि रवींद्र जडेजा यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली. रवींद्र जडेजाने ४ षटकात केवळ १८ धावा दिल्या. भारताचे क्षेत्ररक्षणही चांगले झाले. भारताने दोघा पाकिस्तानी खेळाडूंना धावा बाद केले.
पाकिस्तानकडून उमर अकमल ३३, अहमद शेहजाद २२, सोहीब मसूद २१ धावा केल्या.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.