www.24taas.com, कोलकाता
ऍलिस्टर कूक टीम इंडियासाठी या सीरिजमध्ये चांगलाच धोकादायक ठरतोय. या सीरिजमध्ये तिन्ही टेस्टमध्ये त्यानं सेंच्युरी झळकावत भारताच्या अडचणी चांगल्य़ाच वाढवल्यात. अहमदाबाद टेस्टमध्ये त्यानं 176 रन्सची झुंजार इनिंग खेळली होती. त्यानंतर मुंबई टेस्टमध्ये कूकनं 122 रन्सची निंग खेळत इंग्लंडच्या विजयात निर्णायक भूमिका बजावली होती. आणि आता कोलकाता टेस्टमध्येही त्यानं नॉटआऊट 136 रन्सची इनिंग खेळत भारतीय टीमची डोकेदुखी चांगलीच वाढवली आहे.
कोलकाता टेस्टच्या दुस-या दिवसअखेर इंग्लंडनं 1 विकेट गमावून 216 रन्सपर्यंत मजल मारली आहे. कॅप्टन ऍलिस्टर कूक 136 रन्सवर आणि जोनाथन ट्रॉट 21 रन्सवर नॉटआऊट आहेत. इंग्लिश टीम भारताच्या अजूनही 100 रन्स पिछाडीवर आहे. भारताकडून प्रग्यान ओझाला केवळ इंग्लंडची विकेट घेण्यात यश आलं. बॅट्समनपाठोपाठ टीम इंडियाच्या बॉलर्सनीही साफ निराशा केली आहे. इंग्लिश बॅट्समनना रोखण्यात भारतीय बॉलर्स सपशेल अपयशी ठरले आहेत.
ऍलिस्टर कूकने टीम इंडियाला आपल्या बॅटचा चांगलाच तढाखा दिला आहे. त्यानं टेस्ट क्रिकेटमधील आपली 23 वी सेंच्युरी पूर्ण केली आहे. या सीरिजमधील कूकची ही तिसरी सेंच्युरी ठरली आहे. या सीरिजमध्ये कूक भारतासाठी चांगलीच डोकेदुखी ठरतोय. आता टेस्टच्या तिस-या दिवशी धोकादायक कूकला आऊट करण्याचं अव्हान टीम इंडियाच्या बॉलर्ससमोर असेल.