www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
कोच डंकन फ्लेचर यांनी जेव्हापासून टीम इंडियाची धुरा आपल्या हाती घेतलीय तेव्हापासून टीमच्या खेळाचा आलेख उतरताच राहिलाय. डंकन फ्लेचर यांना याचाच परिणाम भोगावा लागणार असं दिसतंय. बीसीसीआयनं फ्लेचर यांना समन्स धाडलेत.
टेस्ट, वनडे किंवा टी-ट्वेन्टी... कोणत्याही फॉरमॅटमध्ये टीम इंडियानं शानदार परफॉर्मन्स प्रेक्षकांना पाहायलाच मिळाला नाही. याचसंबंधी चेन्नईत बीसीसीआयनं फ्लेचर यांना बोलावणं धाडलंय. या बैठकीत फ्लेचर यांची भेट बीसीसीआय सचिव संजय पटेल यांच्याशी होण्याची शक्यता आहे. श्रीनिवासन हे प्रकृती अस्वास्थ्यामुळे या बैठकीला उपस्थित राहण्याची शक्यता कमीच आहे.
फ्लेचर यांचं कॉन्ट्रॅक्ट एप्रिल महिन्यात संपतंय. टीमचं खराब प्रदर्शन पाहता फ्लेचर यांचं कॉन्ट्रॅक्ट रिन्यू होण्याची शक्यता कमीच... या बैठकीनंतर फ्लेचर टी-२० वर्ल्डकपसाठी बांग्लादेशला रवाना होणार आहेत.
२०११ साली वर्ल्डकपनंतर गॅरी कस्टर्न यांच्याजागी फ्लेचर यांना टीम इंडियाचे कोच म्हणून निवडण्यात आलं होतं. फ्लेचर यांच्या संपूर्ण कार्यकाळात टीमचं प्रदर्शन जैसे-तैसेच राहिलंय. या एप्रिल महिन्यात बीसीसीआयला पुन्हा एकदा टीम इंडियासाठी कोच निवडायचा आहे.
दरम्यान, माजी कॅप्टन सुनील गावसकर यांनी फ्लेचर यांच्यावर जोरदार टीका करत राहुल द्रविडला टीम इंडियाचा कोच म्हणून निवडण्याची मागणी केलीय.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.