सानिया मिर्झा देणार शोएबला घटस्फोट?

भारताची टेनिस स्टार सानिया मिर्झा आणि तिचा नवरा पाकिस्तानी क्रिकेटपटू शोएब मलिक यांच्यात तणाव असल्याचं कळतंय. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सानिया मिर्झा शोएबला घटस्फोट देण्याच्या तयारीत आहे. दोघं मागील अनेक काळापासून एकमेकांना भेटले सुद्धा नाहीयेत.

Aparna Deshpande Aparna Deshpande | Updated: Mar 14, 2014, 12:06 PM IST

www.24taas.com, वृत्तसंस्था, नवी दिल्ली
भारताची टेनिस स्टार सानिया मिर्झा आणि तिचा नवरा पाकिस्तानी क्रिकेटपटू शोएब मलिक यांच्यात तणाव असल्याचं कळतंय. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सानिया मिर्झा शोएबला घटस्फोट देण्याच्या तयारीत आहे. दोघं मागील अनेक काळापासून एकमेकांना भेटले सुद्धा नाहीयेत.
सानियानं १२ एप्रिल २०१०रोजी पाकिस्तानचा माजी कप्तान शोएब मलिकसोबत विवाह केला होता. सानिया आणि शोएबच्या लग्न म्हणजे भारत-पाकिस्तान संबंध सुधारण्यासाठीची एक मजबूत कडी मानली जात होती. गूगल ट्रेंड्सनुसार २०१०मध्ये सानियाला सर्वात जास्त विवाह प्रस्ताव आले होते. शिवाय इंटरनेटवर सगळ्याच जास्त सर्च झालेली व्यक्ती म्हणजे सानिया मिर्झा होती.
सानिया-शोएबच्या लग्नात बऱ्याच अडचणीही आल्या. एप्रिल २०१०मध्ये त्यांचं लग्न होण्यापूर्वी एका मुलीनं आपलं लग्न अगोदरच शोएबसोबत झाला असल्याचा दावा केला होता. आणि त्या मुलीनं शोएबला धमकीही दिली होती की तिनं घटस्फोट देईपर्यंत तो दुसरं लग्न करू शकत नाही. शोएबनं आपलं आधी लग्न झालं असल्याचं अमान्यही केलं होतं. मात्र सानिया सोबत नंतर लग्नकरण्यासाठी त्यानं त्या मुलीसोबत घटस्फोट घेतला आणि सानिया-शोएब विवाहबंधनात अडकले.
मात्र, एवढं सगळं असतांना आता या जोडप्यात तणाव निर्माण झालाय. या तणावाची कारणं अद्याप कळली नसली तरी ती लवकरच आपल्या समोर येईल.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.