आर अश्विनच असंही शतक

भारतीय किक्रेट टीममधील आणखी एका खेळांडूच्या नावे १०० विकेट घेण्याचा विक्रम नोंदविला गेला आहे.

Updated: Mar 1, 2014, 12:24 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुबंई
भारतीय किक्रेट टीममधील आणखी एका खेळांडूच्या नावे १०० विकेट घेण्याचा विक्रम नोंदविला गेला आहे. शुक्रवारी झालेल्या अशिया चषकमध्ये श्रीलंकेविरुद्ध सामन्यात ऑफ स्पिनर रवीचंद्रन अश्विनने कुसाल परेराला आऊट करुन १०० विकेट घेण्याचा विक्रम केला.
भारतीय टीममधील कुंबळे, कपिल, सचिन आणि गांगुली यांच्या नावावर १०० विकेट घेण्याचे विक्रम आहेत. अश्विनच्या कारर्कीदीतील हा ७७व्या एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना होता.
भारतातील १६ खेळाडूंनी १०० विकेट घेतले आहेत. परेराची विकेट घेऊन अश्विन एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १७वा भारतीय गोलंदाज ठरला आहे. मात्र जगात १२०वा खेळांडू ठरला आहे.
या सामन्यामध्ये अश्विनने दोन विकेट घेतल्या. याआधी २०१० मध्ये अश्विन श्रीलंकाविरुद्ध पहिला सामना खेळाला होता. अश्विनने आजपर्यंत भारतात ५५ आणि परदेशात ४५ विकेट घेतल्या आहेत.
एकदिवसीय सामन्यामध्ये भारतीय खेळाडूंपैकी अनिल कुंबळेने सर्वाधिक ३३७ विकेट घेणारा पहिल्या भारतीय खेळांडू ठरला आहे. कुबंळेने ७८व्या सामन्यांमध्ये १०० वी विकेट घेतल्या.
तर श्रीनाथ ३१५ विकेट घेणारा दुसरा गोलंदाज आहे. याशिवाय आगरकर (२८८), कपिल देव (२५३), आशिष नेहरा (१५७), सचिन तेंडुलकर (१५४), आणि सौरभ गांगुली (१००) यांच्या समावेश आहे. अग्रस्थानी श्रीलंकेचा ऑफ स्पिनर मुथय्या मुरलीधरन आहे. त्याने ३५० सामन्यात ५३४ विकेट घेतल्यात.