www.24taas.com, झी मीडिया, ढाका
आशिया कप क्रिकेट स्पर्धेत श्रीलंकेनं भारताला दोन विकेटने हरवलंय, संगकाराचं श्रीलंकेला विजय मिळवून देण्यात मोठं योगदान होतं, संगकाराने १०३ धावा केल्या.
संगकाराला मॅन ऑफ द मॅच देण्यात आली.
भारताने श्रीलंकेपुढे 265 धावांचं आव्हान ठेवलं होतं. श्रीलंकेनं सामन्याच्या शेवटच्या षटकात विजय नोंदवला.
श्रीलंकेचा सलामीवीर कुसल परेरा आणि थिरिमन्नने पहिल्या विकेटसाठी ८० रन्सची भागीदारी केली. थिरिमन्ने ३८ धावांवर बाद झाला.
यानंतर श्रीलंकन बॅटसमन लगोपाठ बाद होत गेले, एक वेळ अशीही आली की, श्रीलंकेचा स्कोर 43.1 षटकात ७ विकेट गमावून २१६ झाला होता.
श्रीलंकेला सामना जिंकण्यासाठी ४१ चेंडूत ४८ धावांची गरज होती, आणि केवळ तीन खेळाडू बाकी होते. मात्र संगकारा मैदानात होता आणि तो भारत आणि विजय यात भिंत बनून उभा होता.
संगकाराने श्रीलंकेला विजयाच्या उंबरठ्यावर आणून ठेवलं होतं.
मात्र 49 व्या षटकात संगकारा तिसऱ्या चेंडूवर बाद झाला, त्यावेळी श्रीलंकेला ९ चेंडूत ७ रन्स आवश्यक होते, मात्र त्यांच्या ८ विकेट पडल्या होत्या.
मात्र पुढील तीन चार चेंडूत श्रीलंकेने ६ रन्स करून सामना बरोबरीत आणला, आणि शेवटी श्रीलंकेला १ रन हवा होता, आणि लंकेने विजय मिळवला.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.