माझा पहिला सिनेमा, फक्त प्रौढांसाठीच- पूनम पांडे

काँट्रोव्हर्सी क्वीन पूनम पांडेच्या पहिल्या वहिल्या हिंदी सिनेमाचं शुटिंग सुरू झालं आहे. हा सिनेमा खूपच बोल्ड आणि उत्कट प्रकृतीचा असणार आहे, असं पूनमने जाहीर करून टाकलंय. मात्र या सिनेमाला सेंसॉर बोर्डाचा त्रास होण्याची शक्यता कमी आहे, असंही तिला वाटतं.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Oct 25, 2012, 06:53 PM IST

www.24taas.com, मुंबई
काँट्रोव्हर्सी क्वीन पूनम पांडेच्या पहिल्या वहिल्या हिंदी सिनेमाचं शुटिंग सुरू झालं आहे. हा सिनेमा खूपच बोल्ड आणि उत्कट प्रकृतीचा असणार आहे, असं पूनमने जाहीर करून टाकलंय. मात्र या सिनेमाला सेंसॉर बोर्डाचा त्रास होण्याची शक्यता कमी आहे, असंही तिला वाटतं.
“हो. माझा सिनेमा फक्त प्रौढांसाठीच आहे. हा सिनेमा ‘बोल्ड’ आहे, पण याची स्क्रीप्ट जबरदस्त आहे. मला माहिती हे, की लोकांना बोल्ड फिल्म्स पाहायला आवडतात. पण मला स्क्रीप्ट महत्वाची वाटतेय. माझ्या पहिल्या सिनेमाबद्दल माझ्या घरच्यांना खूप आनंद झालाय. त्यांचं म्हणणंय की सिनेमात येण्यासाठी माझी वेळ एकदम योग्य आहे.” असं पूनम पांडे म्हणाली.
“या सिनेमातली दृश्यं जास्तचं बोल्ड आहेत पण तरीही मला वाटत नाही, की सेंसॉर बोर्डाकडून आम्हाला त्रास होऊ शकतो.” असं पूनम म्हणाली. जिस्म सिनेमाचा दिग्दर्शक अमित सक्सेना या सिनेमाचं दिग्दर्शन करत आहे.