जेव्हा मध्यरात्री दीपिका गेली रणवीर सिंहच्या घरी...

संजय लीला भंसाळीचा चित्रपट `गोलियों की रासलीला-रामलीला`पासून चांगले मित्र झालेले रणवीर सिंह आणि अभिनेत्री दीपिका पादुकोण जरी आपलं नातं सर्वांसमोर सांगत नसले, तरी इंडस्ट्रीमध्ये जरा वेगळीच चर्चा आहे.

Aparna Deshpande Aparna Deshpande | Updated: Mar 6, 2014, 01:57 PM IST

www.24taas.com, वृत्तसंस्था, मुंबई
संजय लीला भंसाळीचा चित्रपट `गोलियों की रासलीला-रामलीला`पासून चांगले मित्र झालेले रणवीर सिंह आणि अभिनेत्री दीपिका पादुकोण जरी आपलं नातं सर्वांसमोर सांगत नसले, तरी इंडस्ट्रीमध्ये जरा वेगळीच चर्चा आहे.
रणवीर-दीपिकामध्ये काही तरी सुरू आहे याचीच चर्चा सध्या बॉलिवूडमध्ये रंगतेय. दीपिका आपलं नातं लपवण्याचा खूप प्रयत्न करते मात्र तिचा बॉयफ्रेंड काही न काही हिंट देतो, त्यामुळं त्यांच्या नात्याबद्दल खरी माहिती कळतेच. रणवीरच्या आयुष्यात दीपिका किती खास आहे त्यावरून हे कळतंय.
तुम्हाला जर हे खरं वाटत नसलं किंवा त्यांच्या नात्याबद्दल संशय असेल तर हे वाचा... मंगळवारी रात्री रणवीरच्या घरी दीपिका उपस्थित होती. एका प्रत्यक्षदर्शीनं दिलेल्या माहितीनुसार, दीपिका रात्री १२च्या काही वेळ पूर्वी रणवीरच्या घरी पोहोचली आणि संपूर्ण रात्र ती तिथंच होती. दुसऱ्या दिवशी सकाळी ती आपल्या घरी परतली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आपल्या काळ्या रंगाच्या ऑडी कारमध्ये दीपिका रणवीरच्या घरी गेली आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ९ वाजता मर्सिडीजमधून परतली.
आता ही खरंच मैत्री आहे की प्रेम ते येणारा काळ सांगेलच...

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.