मुंबई : चित्रपट हे अनेक प्रकारचे असतात. विनोदी, ऐतिहासिक, सत्य घटनेवर आधारीत, काल्पनिक हे सर्व चित्रपट बनवण्यामागे प्रेक्षकांचे मनोरंजन करणे फक्त येवढाच उद्देश असतो.
परंतु असे काही चित्रपट आहेत, जे आईसमोर असताना नाही बघु शकत. कारण काही चित्रपटामध्ये जास्त अश्लील दृश्य आणि संवाद असतात.
पण कधी तरी चित्रपटांच्या कथानकांच्या गरजेसाठी असे दृश्य किंवा संवाद यांच्या वापर करणे गरजेचे असते.
अशाच पाच चित्रपटांची विषयी
फायर (१९९६) : शबाना आजमी आणि नदिता दास या चित्रपटात प्रमुख भुमिकेत आहे. या चित्रपटचे कथानक हे समलैगिंक संबधांवर आधारीत आहे. कशाप्रकारे आपल्या समाजात आज ही स्त्रीयांकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलेला नाही. यावर भाष करणारा हा चित्रपट आहे. यातील काही सीन फारच उत्तेजक आहेत. काहीमध्ये अंग प्रदर्शनही आहे.
देहली बैली (२०११) : या चित्रपटांचे असे अनेक संवाद आणि दृश्य आहेत जे घरच्यांसोबत नाही बघू शकत. इम्रान खान या चित्रपटांत मुख्य भुमिकेत आहे. भाग डीके बोस या गाण्यावरून बराच वाद झाला होता. संवाद फारच बोल्ड आहे.
बन्डेट क्वीन (१९९४) : फुलन देवीच्या खऱ्या आयुष्यावर आधारीत असलेल्या चित्रपटांत ही खुप जास्त अश्लील द्दश्य दाखवण्यात आलेत. या चित्रपटात बलात्कारचे दृश्य आहे जे तुम्ही घरच्यासमोर असताना नाही बघू शकत. या चित्रपटांत सीमा बिसवास आणि निर्मल पांडे हे मुख्य भुमिकेत आहेत. या एक बलात्काराचा भयंकर सीन दाखविण्यात आला आहे.
एक छोटीसी लव्ह स्टोरी (२००२) : मनिषा कोईरालाच्या या चित्रपटांत एक १५ वर्षाचा लहान मुलगा कशाप्रकारे आपल्या घरासमोर राहत असलेल्या महिलेच्या प्रेमात पडतो असे दाखवण्यात आले आहेत. ती कपडे बदलत असते किंवा तिच्या प्रियकरासोबत इन्टिमेट होत असल्याचे सीन दाखविण्यात आले आहे.
मर्डर (२००४) : या चित्रपटात इमरान हाशमी आणि मलिका शेरावत हे मुख्य भुमिकेत आहे, पती पत्नीच्या आयुष्यात जेव्हा तिसरी व्यक्ती येते त्यानंतर काय घडत यावर भाष करणारा चित्रपट आहे. यात अश्लिल गाणे अश्लिल सिन्स आहेत.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.