पॉर्नस्टार सनी लिऑनला वेध हिंदी शिकण्याचे!

बॉलिवूडमध्ये आल्यानंतर हिंदी शिकण्याचं वेड अनेकांना लागतं. किंबहूना इथं टिकून राहण्यासाठी ते करावंही लागतं. असंच काहीसं वेड सध्या लागलंय सनी लिऑनला. सनी आणि तिचा नवरा सध्या दोघंही हिंदी शिकण्याच्या मागे लागले आहेत.

Aparna Deshpande Aparna Deshpande | Updated: Sep 8, 2013, 04:25 PM IST

www.24taas.com , झी मीडिया, मुंबई
बॉलिवूडमध्ये आल्यानंतर हिंदी शिकण्याचं वेड अनेकांना लागतं. किंबहूना इथं टिकून राहण्यासाठी ते करावंही लागतं. असंच काहीसं वेड सध्या लागलंय सनी लिऑनला. सनी आणि तिचा नवरा सध्या दोघंही हिंदी शिकण्याच्या मागे लागले आहेत.
परदेशात पॉर्नस्टार म्हणून काम केलेली ‘बिग बॉस’च्या घरात आली तिला बॉलिवूडचे दरवाजे खुले झाले. एक अँटम साँग मिळालं... तर अभिनयाचं कौतुकही झालं. मात्र हिंदी येत नसल्यानं भविष्यात त्रास होवू नये म्हणून आता सनी लिऑन हिंदी शिक्षण्याच्या मागे लागलीय.
एकता कपूर ही सनी लिऑनची याबाबतीत प्रवृत्त केल्याचं कळतंय. एकताच्याच चित्रपटात तिला मिळालेलं आयटम साँग प्रेक्षकांच्या तोंडी आजही अगदी ताजं आहे. एकताच्या आगामी चित्रपटामध्ये सनीची भूमिका महत्त्वपूर्ण असल्यानं तिनंही हिंदी शिकणं मनावर घेतलंय. आता सध्या सनी आणि तिचा नवरा दोघंही हिंदी शिकण्यासाठी आठवडय़ातले तीन दिवस काढत आहेत. चित्रपटामध्ये काम मिळण्यासाठी का होईना सनीनं हिंदी शिकण्याच्या घेतलेल्या निर्णयामुळं एकता मात्र तिच्यावर भलतीच खुश झालेली आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.