www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
अभिनेता संजय दत्तने आणखी महिनाभर सुट्टी वाढवण्यासाठी अर्ज केला आहे. संजय दत्त सध्या पॅरोलवर येरवडा जेलमधून घरी आला आहे.
संजय दत्तने आपली पत्नी मान्यताला टीबी असल्याचं नमूद केलं आहे. यामुळे संजय दत्तची पॅरोल आणखी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
संजय दत्तने यापूर्वी घेतलेल्या पॅरोलवर वादंग निर्माण झालं होतं. संजय दत्तला मान्यताच्या शस्त्रक्रियेसाठी २१ डिसेंबरपासून पॅरोलची सुटी मिळाली आहे.
संजय दत्तची ही सुटी ६ डिसेंबर रोजी मंजूर झाली होती. मात्र एका चित्रपटाच्या प्रिमियरला मान्यताने उपस्थिती लावली होती. यामुळे या पॅरोलवर वाद झाल्याने संजय दत्तला १५ दिवसानंतर बाहेर येता आलं. यानंतर संजय दत्तने पत्नीला टीबी असल्याचं सांगितल्याने संजय दत्तची सुटी आणखी वाढण्याची शक्यता आहे.
संजय दत्तवर मुंबईतील १९९३ च्या बॉम्बस्फोटच्या काळात अवैध शस्त्र बाळगल्याचा आरोप आहे. या प्रकरणी संजय दत्त सध्या येरवडा जेलची हवा खातोय.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.