कपिल शर्माने केला स्त्रियांचा अवमान, त्याला कारणे दाखवा नोटीस

गरोदर महिलांबाबत वाचाळ व्यक्तव्य करणाऱ्या कॉमेडी नाईट्स विथ कपिलचा कलाकार कपिल शर्माला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. त्यामुळे त्याचा शो अडचणीत सापडण्याची शक्यता आहे.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Jan 10, 2014, 10:28 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
गरोदर महिलांबाबत वाचाळ व्यक्तव्य करणाऱ्या कॉमेडी नाईट्स विथ कपिलचा कलाकार कपिल शर्माला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. त्यामुळे त्याचा शो अडचणीत सापडण्याची शक्यता आहे.
कॉमेडी नाईट्स विथ कपिल या शो दरम्यान महिलांविरोधात केलेले आक्षेपार्ह विधान कपिलला महागात पडले आहे. राज्य महिला आयोगाने कपिल आणि कलर्स चॅनेलला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. याप्रकरणी येत्या पंधरा दिवसांत कपिलने स्पष्टीकरण देण्याचे या नोटीशीत स्पष्ट करण्यात आले आहे.
कपिलच्या शो विरोधात कायद्याने वागा या संघटनेने राज्य महिला आयोगाकडे धाव घेतली होती. या शोमध्ये महिलांविषयी केले जाणारे आक्षेपार्ह वक्तव्य आणि महिला पात्रांचे सादरीकरण यावर संघटनेने हरकत घेत शोविरोधात कारवाईची मागणी करण्यात केली होती. त्यानुसार त्याला नोटीस बजावण्यात आलेय.
५ जानेवारी रोजी कपिलने त्याच्या शोमध्ये रस्त्यावरील खड्डे इतके जास्त आहेत की, एखाद्या गरीब महिलेची रस्त्यात प्रसूती होईल. त्यावर नवज्योत सिद्ध यांनी बालिशपणे फ्लॉक असा आवाज काढून महिलांची टिंगल उडवली. कपिल हा हजरजबाबी आहे. मात्र, त्याने मातृत्वाची आणि महिलांची अशा प्रकारे थट्टा उडवणे योग्य नाही, अशी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.