`मिस्टर इंडिया २`मध्ये सलमान बनणार `मोगँबो`!

बॉलिवूडचा `दबंग` खान सलमान लवकरच `मिस्टर इंडिया`च्या सिक्वलमध्ये मोगँबोच्या भूमिकेत दिसण्याची शक्यता आहे. ही भूमिका जर सलमानने साकारली, तर त्याच्या कारकीर्दीतील ही त्याची पहिलीच नकारात्मक भूमिका असेल.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Nov 8, 2012, 06:52 PM IST

www.24taas.com, मुंबई
बॉलिवूडचा `दबंग` खान सलमान लवकरच `मिस्टर इंडिया`च्या सिक्वलमध्ये मोगँबोच्या भूमिकेत दिसण्याची शक्यता आहे. ही भूमिका जर सलमानने साकारली, तर त्याच्या कारकीर्दीतील ही त्याची पहिलीच नकारात्मक भूमिका असेल.
मिस्टर इंडियाचा दुसरा भाग बनवण्यासाठी निर्माता बोनी कपूरने अनुराग कश्यपला विचारणा केली आहे. तरीही बोनी कपूरला या सिनेमाचं दिग्दर्शन ‘मिस्टर इंडिया’चे दिग्दर्शक शेखर कपूर यांनीच करावं, असं वाटतंय. तसंच या सिनेमात श्रीदेवीही महत्वपूर्ण भूमिकेत दिसेल. श्रीदेवीने यापूर्वी केलेल्या ‘इंग्लिश विंग्लिश’ सिनेमाला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला होता. याशिवाय या सिनेमात अनिल कपूरही महत्वाच्या भूमिकेत दिसेल.
पुढच्या वर्षाच्या सुरूवातीला सलमान खानची लूक टेस्ट घेण्यात येणार आहे. सलमान ‘मोगँबो’च्या भूमिकेत शोभेल का हे यात तपासून पाहाण्यात येईल. हा सिनेमा २०१४ साली रिलीज होण्याची शक्यता आहे. मिस्टर इंडियाचा सिक्वल रिलीज होण्यापूर्वी जुना ‘मिस्टर इंडिया’ ३-डी मध्ये रिलीज होणार आहे.