सल्लू प्रकरण : तो धमकीचा फोन कोणाचा, वकिलाचा नंबर कसा?

२००२ सालच्या बांद्रा येथील `हीट अॅण्ड रन` प्रकरणात सिने अभिनेता सलमान खानच्या अडचणीत वाढ झालीय. एकीकडे तिन्ही प्रमुख साक्षीदारांनी सलमानला न्यायालयात ओळखलं असताना, या प्रकरणातील प्रमुख साक्षीदाराला धमक्या देण्यात आल्याचा प्रकार समोर आलाय. ज्या फोनवरुन धमकीचा फोन आला, तो एका वकिलाचा नंबर आहे. त्यामुळे सलमानच्या मागे आणखी एका चौकशीचा ससेमिरा लागण्याची शक्यता आहे.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: May 8, 2014, 08:22 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
२००२ सालच्या बांद्रा येथील `हीट अॅण्ड रन` प्रकरणात सिने अभिनेता सलमान खानच्या अडचणीत वाढ झालीय. एकीकडे तिन्ही प्रमुख साक्षीदारांनी सलमानला न्यायालयात ओळखलं असताना, या प्रकरणातील प्रमुख साक्षीदाराला धमक्या देण्यात आल्याचा प्रकार समोर आलाय. ज्या फोनवरुन धमकीचा फोन आला, तो एका वकिलाचा नंबर आहे. त्यामुळे सलमानच्या मागे आणखी एका चौकशीचा ससेमिरा लागण्याची शक्यता आहे.
दिनांक - 4 मे 2014
वेळ - रात्री 9 वाजून 34 मिनिटे झालेली
सलमान खान `हिट एण्ड रन` प्रकरणातील प्रमुख साक्षीदार मुस्लिम शेख याचा फोन खणाणतो..
मुस्लिम शेख - हॅलो... कौन?
धमकी देणारी व्यक्ती - मैं कौन हूँ वो जरुरी नही। मैं जो बोल रहा हूँ, उसे ग़ौर से सुन... तू गवाही देने कोर्ट जा रहा है। मत जा.. पाच लाख रुपये ले और अपना मुँह बंद रख, समझा ।
समोरुन आलेला फ़ोन का आणि कशासाठी आला होता, हे मुस्लिम शेखच्या लक्षात आलं. त्यानं तो फोन कट केला. पण दोनच मिनिटात पुन्हा त्याच नंबरवरुन मुस्लिम शेखला फ़ोन आला.
मुस्लिम शेख - हॅलो...
धमकी देणारा - मैं क्या बोला, समज नही आया क्या?
मुस्लिम शेख - देखो आप मुझसे ऐसी बातें मत करो, मुझे क्या करना है मुझे पता है।
(मुस्लिम शेखनं फोन ठेवला)
धमकीचा हा प्रकार मुस्लिम शेखनं `हिट एण्ड रन` प्रकरणाच्या तपास अधिका-यांना सांगितला. त्यांनी लगेच हा नंबर ट्रेस केला असता, हा नंबर एका वकिलाचा असल्याचं तपासात आढळलं. पोलिसांनी आणि मुस्लिम शेखनं हा सर्व प्रकार न्यायालयालाही सांगितला. महत्त्वाचे म्हणजे या धमक्यांना भीक न घालता, मुस्लिम शेखने न्यायालयात सलमानच्या विरोधात साक्ष दिली. या प्रकरणाची पुढील सुनावणी आता १९ मे रोजी सुनावणी होणाराय.

सिने अभिनेता सलमान खानचं टेन्शन आणखी वाढलंय. कारण 12 वर्षांपूर्वी घडलेल्या अपघाताच्या वेळी सलमान खान हाच गाडी चालवत होता, असं `हिट अँड रन` खटल्यातील दोघा साक्षीदारांनी कोर्टात सांगितलंय. एवढंच नव्हे तर तो दारूच्या नशेत असल्याचं साक्षीदारांनी सांगितल्यानं सलमान चांगलाच अडचणीत आलाय.
दरम्यान, हिट अँड रन प्रकरणातील प्रमुख साक्षीदार मुस्लिम शेख याला धमक्या देण्यात आल्यात. मुस्लिम शेखची आज सेशन्स कोर्टात साक्ष होणार होती. मात्र साक्षीपूर्वीच त्याला धमक्या देण्यात आल्याचा दावा मुस्लिम शेखनं पत्राद्वारे न्यायालयापुढं केलाय. 5लाख रूपये घे आणि तोंड बंद कर, अशी धमकी त्याला देण्यात आलीय.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.