सलमानच्या 'व्हिजा'चा प्रश्न अखेर सुटला!

सलमान खानच्या ‘किक’ या सिनेमांच्या शुटिंगची सुरूवात होण्याआधीच त्याला आलेल्या अडचनीतून आता तो बाहेर पडला आहे. पहिल्यांदा नकार मिळालेला असतांनादेखील त्यांला आता लंडनचा वीजा मिळाला आहे. आणि आता तो लंडनला शुटिंगसाठी जाणार आहे.

Updated: Aug 7, 2013, 12:40 PM IST

www.24taas.com झी मीडिया, मुंबई
लंडनचा व्हिजा मिळण्यासाठी सलमानला एकदा नकार मिळाला पण, आता मात्र त्याला लंडनमध्ये व्हिजाही मिळालाय आणि शुटींगची परवानगीदेखील... त्यामुळे आता लवकरच ‘किक’ या सिनेमाच्या शुटींगसाठी तो लंडनला रवाना होणार आहे.
सलमान खानच्या ‘किक’ या सिनेमांच्या शुटिंगची सुरूवात होण्याआधीच त्याला आलेल्या सलमानसमोर व्हिजाची अडचण उभी राहिली होती. पण या अडचनीतून आता तो बाहेर पडलाय. सलमान खाननं जोधपूरमध्ये १९९८ मध्ये ‘हम साथ साथ है’ या सिनेमाच्या वेळेस झालेल्या शिकारीच्या प्रकरणांविषयाच्या काही कागदपत्रांची पूर्तता वेळेत न झाल्याने त्याचा व्हिजा नाकारला गेला होता. पण, आता त्याला व्हिजा मिळालाय, अशी माहिती सलमानचे वडिल सलीम खान यांनी दिलीय.

दिग्दर्शक साजिद नाडियाडवाला यांच्या ‘किक’ या सिनेमाची शुटिंग लंडनला होतेय. किकची संपूर्ण टीम आधीच लंडनला पोहोचली तरी व्हिजाचा अर्ज नाकारल्यानं सलमानला शुटींगसाठी जाता आलं नाही. सलमानच्या न जाण्याने शुटिंगच्या शेड्यूलमध्ये बदल झाले होते पण आता सलमान खानदेखील एका आठवड्यात लोकेशनवर दाखल होईल. त्यामुळे आता पुन्हा नवीन शेड्यूल आखण्यात येतंय. लवकरच शुटिंगला सुरूवात होईल, साजिद नाडियाडवाला यानं म्हटलंय. त्यामुळे, सलमान खान आता एका आठवड्याच्या आत लंडनसाठी निघणार, हे नक्की झालंय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.