राणी मुखर्जी यश चोप्रासाठी हळहळली

सुप्रसिध्द अभिनेत्री रानी मुखर्जी हिने बॉलिवूड दुनियेतील निर्माता यश चोप्रा यांची भरभरून प्रशंसा केली. तिनं असं म्हटलं की यशजी रिटायर होणार म्हणजे कलाकारांसाठी नुकसानाची बातमी आहे.

Updated: Oct 3, 2012, 03:52 PM IST

www.24taas.com, मुंबई
सुप्रसिध्द अभिनेत्री राणी मुखर्जी हिने बॉलिवूड दुनियेतील निर्माता यश चोप्रा यांची भरभरून प्रशंसा केली. तिनं असं म्हटलं की यशजी रिटायर होणार म्हणजे कलाकारांसाठी नुकसानाची बातमी आहे. 'जब तक है जान' बॉक्स ऑफिसवर रिलीज झाल्यानंतर निर्माता यश चोप्रा बॉलिवूड दुनियेपासून रजा घेणार आहेत, असं समजतंय.
यश चोप्रा यांनी सिनेसृष्ट्रीला लक्षात राहतील असे अनेक सुपर-डूपर हिट सिनेमे दिलेत. वक्त, दिवार, सिलसिला आदी चित्रपट प्रेक्षकांच्या आजही काळजात घट्ट रुतून बसलेत.
राणी म्हणते, 'बॉलिवूड मधील नवीन तसेच जुन्या सगळ्या कलाकरांना पुढे आणण्यात यशजींचा मोलाचा वाटा आहे. सेटवर ते सगळ्यांना अतिशय सुरेख पद्धतीने अॅक्टिंगचे धडे द्यायचे. त्यासाठी यशजींसोबत काम न करायला मिळणे नुकसानच आहे. मी खूप लकी आहे कारण मला त्यांच्यासोबत चित्रपट करायला मिळाले'
राणीने 'मुझसे दोस्ती करोगे' हा पहिला सिनेमा यशजींसोबत केला होता. त्यानंतर तिने साथिया, हम-तूम, बंटी और बबली आणि थोडा प्यार थोडा मॅजिक यांसारख्या यश चोप्रांच्या अनेक चित्रपटांत काम केलंय.
यश चोप्रा यांच्या 'वीर-जारा' या सिनेमात राणीचा रोल अतिशय महत्त्वाचा होता. 'जब तक है जान रिलीज झाल्यानंतर मी निवृत्ती घेणार आहे' असं यश चोप्रा यांनी जाहीर केलंय. आपल्या ८० व्या वाढदिवसाला यश चोप्रा यांनी हे विधान केलं होतं. त्यांचा 'जब तक है जान' हा सिनेमा १३ नोव्हेंबर रोजी रिलीज होणार आहे.