गिरीश ओकांच्या आवाजाची चोरी, रामूला पडली भारी!

मराठी अभिनेते गिरीश ओक यांचा आवाज चोरल्याप्रकरणी रामगोपाल वर्मा गेल्या काही दिवसांपासून वादात सापडले होते. अखेर राम गोपाल वर्मांनी माफीनामा सादर केला आहे.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Apr 21, 2013, 11:26 PM IST

www.24taas.com, मुंबई
मराठी अभिनेते गिरीश ओक यांचा आवाज चोरल्याप्रकरणी रामगोपाल वर्मा गेल्या काही दिवसांपासून वादात सापडले होते. अखेर राम गोपाल वर्मांनी माफीनामा सादर केला आहे.
सत्या २ सिनेमासाठी राम गोपाल वर्मांनी डॉ. गिरीश ओक यांना ऑडिशनसाठी बोलावलं. त्यांच्या आवाजात एक उतारा वाचून घेतला. मात्र त्यांच्या नकळत त्यांची वाक्यं सिनेमाच्या प्रोमोमध्ये वापरण्यात आली. या प्रकरण डॉ. ओकांनी राम गोपाल वर्मा यांच्याशी बोलायचा प्रयत्न केला. मात्र त्यांना प्रतिसाद मिळाला नाही.

यानंतर शिवसेना चित्रपट सेनेने याबाबत कडक आंदोलनाचा इशारा दिला होता. लेखी माफीनामा दिला नाही, तर आंदोलन तीव्र करू, असा इशारा शिवसेना चित्रपट सेनेचे अध्यक्ष आदेश बांदेकर यांनी दिला होता. राम गोपाल वर्माला महाराष्ट्रात शुटिंगसाठी बंदी घालू, असा इशाराही त्यांनी दिला. अखेर आज राम गोपाल वर्मांनी लेखी माफीनामा सादर करत प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केलाय.