गुजरात दंगली प्रकरणी मोदींना माफी मागायची गरज नाही- सलमान

बॉलिवूडचा दबंग खान सलमाननं पुन्हा एकदा नरेंद्र मोदींची स्तुती केलीय. सलमाननं एका न्यूज वाहिनीसोबत बोलतांना गुजरात इथं २००२मध्ये झालेल्या दंगली प्रकरणी नरेंद्र मोदींनी माफी मागण्याची काही गरज नाही, असंही म्हटलंय. सलमान म्हणतो जेव्हा कार्टानं याबाबतीत त्यांना क्लीनचिट दिलीय. तर मोदींना मागण्याची गरज नाही.

Aparna Deshpande Aparna Deshpande | Updated: Jan 20, 2014, 11:22 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
बॉलिवूडचा दबंग खान सलमाननं पुन्हा एकदा नरेंद्र मोदींची स्तुती केलीय. सलमाननं एका न्यूज वाहिनीसोबत बोलतांना गुजरात इथं २००२मध्ये झालेल्या दंगली प्रकरणी नरेंद्र मोदींनी माफी मागण्याची काही गरज नाही, असंही म्हटलंय. सलमान म्हणतो जेव्हा कार्टानं याबाबतीत त्यांना क्लीनचिट दिलीय. तर मोदींना मागण्याची गरज नाही.
मोदी यांनी अहमदाबाद इथं आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सवाचे आयोजन केलं होतं. याठिकाणी सलमान आपल्या `जय हो` चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी हजेरी लावली होती. तसंच त्यानं मोदी यांच्यावर स्तुतीसुमनंही उधळली होती. त्यामुळं मोदी आणि सलमान यांच्यात जवळीक वाढत असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली होती.
सलमान म्हणतो, मी मोदींच्या बाबतीत निर्णय द्यायला न्यायाधिश नाहीय. जर मी मोदींना भेटलो तर एवढा गोंधळ का होतोय? जेव्हा सलमानला विचारण्यात आलं की, मोदी चांगले पंतप्रधान होऊ शकतात का? तर सलमाननं आपण निर्णय देणारे कोण, मोदींसोबत पतंग महोत्सवात सहभागी झाल्यानं खूप आनंद वाटला, असं सलमाननं उत्तर दिलं.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.