'जासूसी' करून करून कॅट वैतागली!

बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री कटरीना कैफ हल्ली 'जासूसी' करून कटाळलीय. आता तुम्ही म्हणाल 'कॅट' कुणाची जासूसी करतेय...? 

Updated: Jul 9, 2015, 05:45 PM IST
'जासूसी' करून करून कॅट वैतागली! title=

मुंबई : बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री कटरीना कैफ हल्ली 'जासूसी' करून कटाळलीय. आता तुम्ही म्हणाल 'कॅट' कुणाची जासूसी करतेय...? 

पण, कॅट सध्या 'जासूसी' आपल्या रीयल लाइफमध्ये नाही तर 'रील' लाईफमध्ये करतेय. कतरीना सध्या रणबीर कपूर प्रोडक्शनचा पहिलाच चित्रपट असलेल्या 'जग्गा जासूस'च्या शूटींगमध्ये बिझी आहे. 

'जग्ग जासूस'चं सध्या री-शूट सुरू आहे. सूत्रांच्या म्हणण्यानुसार, कटरीना याच री-शूटला आता वैतागलीय. चित्रपटाचं शूटींग २०१३ मध्ये सुरू झालंय... पण, ते अजूनही रेंगाळतच चाललंय. 

'जग्गा जासूस' या चित्रपटाचं अनुराग बासू दिग्दर्शन करतोय... आणि परत परत तेच तेच शूटींग करून वैतागलेली कतरीना अनुरागला आता आपल्या डेटस् द्यायला तयार नाही. त्यामुळेच, अनुराग आणि कतरीना यांच्यातही थोडीफार कुरबूर सुरू आहेत. 

मिळालेल्या माहितीनुसार, या चित्रपटाचं अजूनही ७० दिवसांचं काम बाकी आहे. महत्त्वाचं म्हणजे, जग्गा जासूस या चित्रपटातून रणबीर कपूर पहिल्यांदाच निर्माती क्षेत्रात उतरतोय. हा चित्रपट नोव्हेंबरपर्यंत प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.