...जेव्हा सैफसमोर बेगमनं शाहीदला केलं स्तब्ध!

आपल्या करिअरच्या सुरुवातीच्या दिवसांत बॉलिवूडचं एक जोडपं भलतंच फॉर्ममध्ये होतं... परंतु, दोघांत काहीतरी बिनसलं आणि नंतर दोघांनीही वेगवेगळ्या वाटा निवडल्या... हे जोडपं म्हणजे सध्याची बेगम करीना आणि शाहीद कपूर...

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Apr 29, 2014, 04:29 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
आपल्या करिअरच्या सुरुवातीच्या दिवसांत बॉलिवूडचं एक जोडपं भलतंच फॉर्ममध्ये होतं... परंतु, दोघांत काहीतरी बिनसलं आणि नंतर दोघांनीही वेगवेगळ्या वाटा निवडल्या... हे जोडपं म्हणजे सध्याची बेगम करीना आणि शाहीद कपूर... पण, हेच जोडपं आता कित्येक वर्षानंतर एकमेकांच्या समोरासमोर आल्यानं अनेकांच्या नजरा आपसुकचं त्यांच्याकडे वळल्या...

बेगम करीना आपल्या शत्रुत्वाबद्दल चांगलीच प्रसिद्ध आहे. ज्या लोकांबद्दल तिच्या मनात एकदा का अढी निर्माण झाली ती त्यांच्याकडे नंतर ढुंकनही पाहत नाही, हे बऱ्याचदा समोरही आलंय. हे मान्य करायलाही करीना मागे-पुढे पाहत नाही. काही वर्षांपूर्वी करीना आणि शाहीदवर प्रेमाचा जोरदार रंग चढला होता. परंतु, ब्रेकअपनंतर मात्र गेल्या सात वर्षांमध्ये या दोघांनी एकमेकांची विचारपूसही केली नाही. एव्हढंच नाही तर कोणत्याही कार्यक्रमातही चुकूनसुद्धा आपला आमना-सामना होणार नाही याची पुरेपूर काळजी घेतली होती, पण...

नुकतंच, फ्लोरिडाच्या टांपा बेमध्ये सुरु पार पडलेल्या ‘आयफा’ सोहळ्यात हे दोघंही एकमेकांसमोर आले... आणि अनेकांचं नजरा त्यांच्यावर स्थिर झाल्या... दोघंही एकमेकांकडे दुर्लक्ष करतील असं वाटत असतानाच करीनानं पुढं होऊन शाहीदला स्मितहास्यासहीत ‘हलो शाहीद’ म्हटलं. महत्त्वाचं म्हणजे यावेळी बेगम करीनासोबत तिचा पती सैफ अली खानही उपस्थित होता.
करीनाचा हा झटका शाहीदलाही पचायला थोडं जडचं गेलं... शाहीद फक्त तिच्याकडे पाहतच राहिला... आता करीनाच्या या बदललेल्या तेवरनं शाहीद शॉक झाला होता की सरप्राईज हे त्याचं त्यालाच माहीत... पण, तो काही वेळ जागेवरच खिळून राहिला... यानंतर तो करीनाच्या शालिन ‘हलो’ला काही उत्तर देणार तेव्हापर्यंत ती पुढे निघून गेली होती.
या खऱ्याखुऱ्या ‘सीन’ची त्यानंतर कित्येक वेळ उपस्थितांमध्ये जोरदार चर्चा सुरू होती. परंतु, करीनानं मात्र इकडे फिरकण्याऐवजी संपूर्ण वेळ बॅकस्टेज राहणंच पसंत केलं.
सध्या, करीना आणि शाहीद दोघंही आपला भूतकाळ विसरून आपल्या वैयक्तिक आयुष्यात पुढे सरकलेत... मात्र, या ‘क्यूट कपल’ची केमिस्ट्री पुन्हा एकदा ऑनस्क्रिन दिसणार का याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलंय.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.