www.zee24taas.com, झी मीडिया, मुंबई
`देशात खेळाला प्रोत्साहन देणं गरजेचं आहे. सुविधांच्या अभावामुळे खेळाडू उत्तम कौशल्य दाखवू शकत नाही आणि मग त्यांना अनेक अडचणींना सामोरं जावं लागतं,` अशी ही देशातील खेळाची अवस्था पाहून सलमान खान नाराज झालाय.
सलमान खानने ही नाराजी त्याचा आगामी चित्रपट `ख्वाब` मधून व्यक्त केलीय. `ख्वाब` मध्ये त्यांने खेळाडूंना मिळणारी सुविधा, प्रशिक्षण यांची सद्स्थिती तसंच या परिस्थितीत खेळाडू कसं प्रदर्शन करणार? हे दाखवण्याचा प्रयत्न केलाय.
सलमान खानचे या सर्व परिस्थितीवर असं म्हणणं आहे की, जेव्हा आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक स्पर्धेत भारतीय खेळाडूंना पदक मिळत नाही, तेव्हा मात्र आपणच त्यांच्यावर टीका करतो. इथे जेवणाचे हाल आहेत, बेरोजगारी वाढतेय त्याबद्दल कोणी काही आवाज उठवत नाही.
सलमान खानचा `ख्वाब` चित्रपट मे महिन्यात प्रदर्शित होतोय. त्यात नवदीप सिंग, सिमर मोतियानी, ऋषी मिगलानी आणि नफीसा अली यांची महत्त्वपूर्ण भूमिका आहे.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.