मिस्टर परफेक्शनिस्ट आमिरला गोल्डन केला अॅवॉर्ड!

भारत हॅबिटेट सेंटरमध्ये शनिवारी `गोल्डन केला पुरस्कार` हा अनोखा पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. यंदा अॅवॉर्ड्सचं सहावं वर्ष होतं. हा पुरस्कार बॉलिवूडमधील सर्वात वाईट चित्रपट आणि अभिनयासाठी दिला जातो.

Updated: Mar 30, 2014, 12:30 PM IST

www.zee24taas.com, झी मीडिया, मुंबई
भारत हॅबिटेट सेंटरमध्ये शनिवारी `गोल्डन केला पुरस्कार` हा अनोखा पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. यंदा अॅवॉर्ड्सचं सहावं वर्ष होतं. हा पुरस्कार बॉलिवूडमधील सर्वात वाईट चित्रपट आणि अभिनयासाठी दिला जातो.
`गोल्डन केला पुरस्कार २०१३`च्या पुरस्कार सोहळ्यात सर्वात वाईट अभिनेता म्हणून अजय देवगण आणि वाईट अभिनेत्री म्हणून सोनाक्षी सिन्हाची निवड करण्यात आली. अजयला `हिम्मतवाला` आणि सोनाक्षीला `आर... राजकुमार` या चित्रपटासाठी हा पुरस्कार देण्यात आला. तसंच `हिम्मतवाला` या चित्रपटाला यंदाचा सर्वात वाईट चित्रपट म्हटलं गेलं.
तर मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानला `धूम-३`चित्रपटातील अभिनयासाठी `बावरा हो गया है के` हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. सर्वात वाईट सहाय्यक कलाकारचा पुरस्कार आदित्य रॉय कपूरला `ये जवानी है दिवानी` आणि दीपिका पदुकोन, जॅकलीन फर्नांडिस आणि अमिषा पटेल यांना `रेस-२`साठी विभागून देण्यात आलाय.
बॉलिवूडमध्ये बॉक्स ऑफिसची आकडेवारी चित्रपट गुणवत्तेशी जुळत नाही. तसंच त्या आकड्यांचा अभिनेत्यांना १० वर्षांनी विसरही पडतो. मात्र `केला पुरस्कार`चा विसर पडूच शकत नाही, असं `गोल्डन केला पुरस्कार`चे प्रमुख आनंद सिंह यांनी म्हटलंय.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.