www.24taas.com, झी मीडिया, बंगळूर
ज्येष्ठ गायक मन्ना डे यांना बंगळूरमध्ये एका रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या छातीत दुखू लागल्याने तात्काळ रूग्णालयात दाखल केले.
छातीत जंतूसंसर्ग झाल्यामुळे शनिवारी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मन्ना डे यांची प्रकृती गंभीर असल्याचे रुग्णालयात प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. मन्ना डे यांचे वय ९४ वर्षे असून, गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर निवासस्थानीच उपचार सुरु होते.
शनिवारी त्यांची प्रकृती जास्त खालावल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मन्ना डे यांना चित्रपटसृष्टीतील सर्वोच्च मानल्या जाणाऱ्या दादासाहेब फाळके पुरस्काराने २००७ मध्ये गौरविण्यात आलेले आहे.
मन्ना डे भारतीय संगीतामधील आवाजांचा बाहशहा म्हणून ओळखले जाते. ५० ते ६० दहशकात हिंदीमध्ये राग आधारित गाण्यांसाठी मन्ना डे यांना पसंती दिली जात असे.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.