एकता कपूर मोठ्या पडद्यावर आणणार `गे लव्हस्टोरी`!

इम्रान खान आणि दीपिका पादुकोणसोबत `ब्रेक के बाद` या चित्रपटाद्वारे आपलं करिअर सुरू करणारा दिग्दर्शक दानिश अस्लम आता एक नवा चित्रपट घेऊन येतोय. या चित्रपटाची प्रोड्यूसर आहे एकता कपूर...

Aparna Deshpande Aparna Deshpande | Updated: Feb 8, 2014, 03:39 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
इम्रान खान आणि दीपिका पादुकोणसोबत `ब्रेक के बाद` या चित्रपटाद्वारे आपलं करिअर सुरू करणारा दिग्दर्शक दानिश अस्लम आता एक नवा चित्रपट घेऊन येतोय. या चित्रपटाची प्रोड्यूसर आहे एकता कपूर...
बालाजी मोशन पिक्चर्सच्या आगामी चित्रपटात असेल रोमियो-ज्यूलिएटची लव्हस्टोरी पण ही एका ट्विस्टसह... कारण ही स्टोरी असेल `गे लव्हस्टोरी`.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार चित्रपटाची कथा अनु मेनननं लिहिलीय. मेनननं यापूर्वी `लंडन, पॅरिस,न्यूयॉर्क` चित्रपटाची स्क्रिप्ट लिहिली होती. सिनेमा दोन मुलं आणि एका मुलीच्या भोवताल फिरतो. दोन मुलांपैकी एक मुलगा होमोसेक्शुअल असतो. चित्रपट मे महिन्यात रिलीज होईल.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.