अमिताभ बच्चन `पाकिस्तानी`!

ऑस्कर पुरस्कार विजेते रसूल पोक्कुट्टी प्रथमच दिग्दर्शनात पाऊल ठेवत आहे. या सिनेमामध्ये अमिताभ बच्चन पाकिस्तानी नागरिकाची भूमिका साकारणार आहेत. रसूल पोक्कुट्टी यांचा आगामी सिनेमा हा रसूल यांचा ड्रिम प्रोजेक्ट आहे. या सिनेमाचा विचार त्यंच्या मनात अनेक वर्षं घोळत होता. मात्र आता तो पडद्यावर येण्यास सुरूवात होणार आहे.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Aug 30, 2012, 09:10 AM IST

www.24taas.com,
ऑस्कर पुरस्कार विजेते रसूल पोक्कुट्टी प्रथमच दिग्दर्शनात पाऊल ठेवत आहे. या सिनेमामध्ये अमिताभ बच्चन पाकिस्तानी नागरिकाची भूमिका साकारणार आहेत. रसूल पोक्कुट्टी यांचा आगामी सिनेमा हा रसूल यांचा ड्रिम प्रोजेक्ट आहे.
या सिनेमाचा विचार त्यंच्या मनात अनेक वर्षं घोळत होता. मात्र आता तो पडद्यावर येण्यास सुरूवात होणार आहे.
“या सिनेमामध्ये अमिताभ बच्चन पाकिस्तानी माणसाची भूमिका करणार आहेत. मात्र जरी बच्चन पाकिस्तानी दाखवले असले हा सिनेमा राजकीय पार्श्वभूमीवर आधारीत नाही. हा सिनेमा मानवी भावनांचाच आहे. हा सिनेमा दोन्ही देशांमधील लोकांना आपलासा वाटेल.” असं रसूल पोक्कुट्टी म्हणाले.

हा सिनेमा वडील आणि मुलगा यांच्यातील नातेसंबंधावर आहे, असं काही सूत्रांकडून सांगण्यात येतंय. पोक्कुट्टी हे पहिल्यांदाच दिग्दर्शन करत असून अमिताभ मुख्य भूमिका साकारण्यास तयार झाल्यामुळे पोक्कुटी आनंदी झाले आहेत. पोक्कुट्टी यांना स्लमडॉग मिलेनियर सिनेमातील साऊंड डिझाइनिंग/ मिक्सिंगसाठी त्यांना ऑस्कर तसंच अकॅडमी अवॉर्ड मिळालं होतं.